टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड (INDvENG) यांच्यात होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला ऍडलेड ओव्हलवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सराव करतानाचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाउंटवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळताना दिसत आहे. ज्याचा परिणाम इंग्लंडवर होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) याने उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 123.00 च्या सरासरीने 246 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यातील त्याने पाकिस्तान विरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 82 धावांची खेळी केली ही सर्वोत्तम ठरली आहे.
विराटने इंस्टाग्रामवर त्याचा नेटमध्ये प्रॅक्टीस करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो वेगवेगळे शॉट्स खेळताना दिसत आहे. उपांत्य फेरीचा सामना ऍडलेडवर होणार आहे आणि विराटने आधीच सांगितले त्याचे हे मैदान आवडते आहे. या मैदानावर भारताने या स्पर्धेत बांगलादेशवर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 5 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विराटने नाबाद 64 धावा केल्या होत्या. यामुळे तो सामनावीरही ठरला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील त्याची कामगिरी पाहिली तर त्याने हे मैदान उत्तम गाजवले आहे.
https://www.instagram.com/reel/CksKIWIgKAc/?utm_source=ig_web_copy_link
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराटने ऍडलेडवर एकूण 14 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 75.58 च्या सरासरीने तब्बल 907 धावा निघाल्या. यादरम्यान त्याने पाच शतके केली.
टी20 क्रिकेटची कामगिरी पाहिली तर विराटने ऍडलेडमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहे आणि दोन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला आहे. त्याने पहिला सामना 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये त्याने नाबाद 90 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशविरुद्धची नाबाद 64 खेळी, यामुळे त्याच्या 2 डावांमध्ये 155.55च्या सरासरीने 154 धावा झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने भारताने जिंकले.
यामुळे विराट इंग्लंडविरुद्ध कशी खेळी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले ‘नॅशनल धोबी’
‘आजूबाजूला गोष्टी कितीही वेगाने घडूद्या…’, जोस बटलरने उपांत्य सामन्यापूर्वा केले रोहितचे कौतुक