‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’च्या उद्घाटनाच्या सामन्यात शुक्रवारी (५ मार्च) इंडिया लिजेंड्स संघाने बांगलादेश लिजंड्सवर १० गड्यांनी मात करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली. भारताच्या विजयाचा नायक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ठरला. सेहवागने अवघ्या ३५ चेंडूमध्ये ८० धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याचवेळी, सेहवागने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत चाहत्यांना जुन्या सेहवागची आठवण करून दिली.
सेहवागने केली चौकार मारून सुरुवात
आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अनेक वेळा सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सुरुवात करणाऱ्या सेहवागने या सामन्यात देखील पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. बांगलादेश लिजेंड्सचा कर्णधार मोहम्मद रफीक इंडिया लिजेंड्सच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला असता, सेहवागने ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या चेंडूवर सणसणीत चौकार मारला. त्याच्या या चौकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सेहवागने या पहिल्या षटकातच १९ धावा चोपून भारताच्या विजयाची पायाभरणी केली.
https://twitter.com/madhyananuj/status/1367875588636090368
https://twitter.com/Kapilvarala/status/1367862604425691138
#Sehwag &1st ball boundary is a never ending love story ???????? #indvsban @virendersehwag pic.twitter.com/8BwaTyHlSN
— Vinay_Reddy.29 (@Rexxy_09) March 5, 2021
भारताचा मोठा विजय
रायपूर येथील वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स व बांगलादेश लिजेंड्स यांच्यादरम्यानच्या सामन्याने ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ला सुरुवात झाली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना धावाफलकावर अवघ्या १०९ धावा लावल्या. इंडिया लिजेंड्सच्या गोलंदाजांनी अत्यंत किफायतशीर मारा करत बांगलादेशला २० व्या षटकापर्यंत सर्वबाद केले. इंडिया लिजेंड्ससाठी विनय कुमार, प्रज्ञान ओझा व युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, इंडिया लिजेंड्सकडून वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर या विश्वविख्यात जोडीने डावाची सुरुवात केली. दोघांनी अवघ्या १०.१ षटकात भारताला विजयी लक्ष गाठून दिले. सेहवागने ३५ चेंडूंमध्ये १० चौकार व ५ षटकारांसह ८० धावांची नाबाद खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
युवराज पुन्हा ऑन फायर! बांगलादेशच्या दोन फलंदाजांना केले क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप
पुन्हा एकदा ‘विरू के शोले’! ३५ चेंडूत खेळली ८० धावांची खेळी, इंडिया लिजेंड्सचा मोठा विजय






