केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊन येथे होणार आहे. या मालिकेत पहिल्या २ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झालेली असल्याने तिसरा सामना निर्णायक सामना असणार आहे. या सामन्यातून नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतीनंतर भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघाबाहेर कोणाला करणार याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अंतिम ११ जणांच्या संघाबद्दल संकेत दिले आहेत.
सध्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर त्यांच्या खराब फॉर्ममुळे टीका होत आहे, त्यांना संघाबाहेर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, द्रविडने या खेळाडूंना आणखी पाठिंबा दिला जाणार असल्याचे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता हनुमा विहारीला अंतिम ११ जणांमधील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे, तसेच श्रेयस अय्यरलाही खेळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
श्रेयस दुसऱ्या कसोटीत पोटाच्या वेदनेमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, हनुमा विहारीने या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण आता त्यांना संघात जागा पक्की होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
द्रविड म्हणाला, ‘सर्वात पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की विहारीने दोन्ही डावात चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात भाग्याने त्याची साथ दिली नाही आणि त्याचा उत्तम झेल घेतला. दुसऱ्या डावात त्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि संघाचे मनोबल वाढवले.’
तसेच द्रविडने श्रेयस अय्यरचे कौतुक करताना म्हटले की ‘श्रेयसने जेव्हाही संधी मिळाली तेव्हा चांगले प्रदर्शन केले आहे आणि आशा आहे की त्याचीही वेळ लवकरच येईल.’
द्रविडने केलेल्या या विधानांमुळे असा कयास लावला जात आहे की, भारतीय संघ व्यवस्थापन रहाणे आणि पुजारा यांनाच केपटाऊन कसोटीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
द्रविड पुढे म्हणाला, ‘जर तुम्ही आमच्या संघातील काही खेळाडूंना पाहिले, तर लक्षात येते ते वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यांनाही प्रतिक्षा करावी लागली होती आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप धावा बनवल्या होत्या. त्यामुळे असं (प्रतिक्षा करावी लागणे) होत राहातं. हाच खेळाचा नियम आहे.’
केपटाऊन कसोटी ११ ते १५ जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो
इमर्जन्सीमध्ये यष्टिरक्षणाला उतरला आणि केली विश्वविक्रमाची बरोबरी! ओली पोपचा कारनामा
बटलर-बेअरस्टोसारखे यष्टीरक्षक संघात असताना पोपला करावे लागले यष्टीरक्षण; ‘हे’ आहे कारण