चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त काल गुरुवार दि.२ जानेवारी २०२० पासून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्थानिक पुरुष प्रथम श्रेणी (निमंत्रित संघ) राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आचार्य धर्मराज श्री.विजय जोशी गुरुजी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
तदप्रसंगी समारंभाध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष श्री.उमेश नाईक, नगरसेवक श्री.रमाकांत रहाटे,श्री.मिलिंद तुळसकर, उपाध्यक्ष भाजपा- मुंबई, नगरसेविका सिंधूताई मसुरकर,शाखाप्रमुख श्री.हेमंत कदम,श्री.शंकर बावदाणे,मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोरे, कार्याध्यक्ष मनोहर इंदुलकर, मंडळाचे मानदसचिव श्री.वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष श्री. अतुल केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पडणेकर यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना व खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. रात्रींस खेळ चाले मालिका फेम सौ. संजीवनी पाटील (वच्छी) यांची विशेष उपस्थिती होती.
विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध सत्यम क्रीडा मंडळ मुंबई उपनगर व नूतन सोनार सिद्धधाटव रायगड विरुद्ध युवा स्पोर्ट्स मुंबई शहर यादोन सामान्यांनी स्पर्धेचा उद्घाटन झाले. विजय क्लब विरुद्ध सत्यम यांच्यात मध्यंतरापर्यत चुरशीची लढत बघायला मिळाली. २१-१७ अश्या छोट्याशा आघाडी नंतर मात्र विजय क्लब संघाने गियर बदलत सामनापूर्णपणे आपल्याकडे फिरवला. अजिंक्य कापरे, सुनील पाटील यांच्या चढाया व विजय दिवेकर, चिन्मय परब यांच्या भक्कम बचावाच्या जोरावर विजय क्लबने ४३-२९ अशी बाजी मारली.
स्पर्धेच्या आयोजनात मंडळाचे उपाध्यक्ष श्री.महेश पेडणेकर,श्री.विद्याधर घाडी, श्री.चारुदत्त लाड, श्री.प्रणील पांचाळ,श्री.रोहन मेहेर,श्री.गणेश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
नूतन सोनार सिद्धधाटव रायगड संघाने युवा स्पोर्ट्स मुंबई शहर विरुद्ध ३६-०८ असा एकतर्फी विजय मिळवला. प्रवीण दुबे, भारत मालुसरे यांनी चांगला खेळ केला. अभिषेक नर व नामदेव इस्वालकर यांच्या खेळाच्या जोरावर जॉली स्पोर्ट्सने ४३-१९ असा स्व आकाश क्रीडा मंडल ठाणे संघाचा पराभव केला.
मुंबई उपनगरच्या स्वस्तिक मंडळाने ठाणेच्या श्री हनुमान सेवा मंडळ संघावर ४२-२३ अशी मात दिली. स्वस्तिक कडून अकरम शेखणे चतुरस्त्र खेळ केला. अभिषेक चव्हाण व ऋषी कांबळी यांनी चांगल्या पकडी केल्या. केदारनाथ उपनगर विरुद्ध विजय नवनाथ मुंबई शहर यांच्यात चांगली लढत झाली. मध्यंतरापर्यत २१-१० अशी विजय नवनाथ यांच्याकडे होती. नंतर मात्र केदारनाथ संघाने चांगला कमबॅक करत सामन्यात चुरस निर्माण केली. विजय नवनाथने ३३-२९ अशी बाजी मारली.
मुंबई शहरच्या अमर क्रीडा मंडळाने नूतन सोनार सिद्धधाटव रायगड संघाचा २२-१६ असा पराभव केला. अमर कडून शुभम गाडे व नितीन विचारे यांनी चांगला खेळ केला. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यात विजय क्लब संघाने विजय बजरंग व्यायम संघावर ३४-१० असा विजय मिळवत आपल्या गटातील दोन्ही सामने जिंकून बादफेरीत प्रवेश केला.
गुवाहाटी येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी असे असतील महाराष्ट्र कबड्डी संघ…
वाचा????https://t.co/WIBWahXDQd????#Kabaddi #म #मराठी #Maharashtra #kheloindia— Maha Sports (@Maha_Sports) January 1, 2020
…म्हणून पाकिस्तानने विश्वचषकासाठीच्या संघातून या युवा खेळाडूचे नाव घेतले मागे
वाचा????https://t.co/5X2GTbSLBY????#म #मराठी #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020