विजय हजारे स्पर्धत मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्याला हजर न राहिल्यामुळे भारतीय संघाचा स्टार सलामीवीर आणि तामिळनाडूचा खेळाडू मुरली विजयला उर्वरीत सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले.
त्यामुळे ६ पैकी त्याला या स्पर्धेत तामिळनाडूकडून केवळ पहिले २ सामने खेळता आले. तामिळनाडू संघही विजय हजारे स्पर्धतू साखळी फेरीतुन बाहेर पडला.
विजय त्या सामन्याला दुखापतीमूळे हजर राहीला नसला तरी याची कल्पना त्याने निवड समिती, फिजीओ किंवा व्यवस्थापनाला दिली नसल्याचे पुढे आले. त्याच दिवशी त्याच्या जागी संघात दुसऱ्या खेळाडूची निवड झाली. यामूळे विजय मात्र चांगलाच नाराज झाला.
काल जेव्हा त्याने आपला क्लब जॅाली रोवरसाठी शतकी खेळी केली तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्याने उघड नाराजी व्यक्त केली.
“जे काही घडल त्याबद्दल मला दुःख झाले. यापेक्षा चांगल्या प्रकारे ती परीस्थिती हाताळता आली असती. मी लवकरच तामिळनाडू क्रिकेट बोर्डातील अधीकाऱ्यांशी बोलणार आहे आणि मला अपेक्षा आहे की सर्व ठिक होईल. ” असे मुरली विजय म्हणाला.
“माझ्या क्रिकेटप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल शंका घेतल्याने मोठे दुःख झाले. मला तामिळनाडूकडून क्रिकेट खेळायला आवडते आणि माझ्या राज्याकडुन क्रिकेट खेळणे हे मी अभिमानाचे समजतो. माझे स्नप्न तामिळनाडूला रणजी ट्राॅफी जिंकून द्यायचे आहे.” असेही तो पुढे म्हणाला.