---Advertisement---

सलग तीन सामन्यांत रैनाची दमदार कामगिरी, २०१९ विश्वचषकात होऊ शकते जागा पक्की

On: शनिवार, ऑक्टोबर 6, 2018 10:11 PM
---Advertisement---

भारतीय वन-डे संघातून वगळण्यात आलेला अनुभवी सुरेश रैनाने विजय हजारे ट्राॅफीत चमकदार कामगिरी केली आहे.

रैना विजय हजारे ट्रा्ॅफीत उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने या स्पर्धेत सलग तीन अर्धशतक झळकावली आहेत. या स्पर्धेत त्याला चांगली सुरुवात करता आली नव्हती. त्याने पहिल्या तीन सामन्यात 22,1, 14* धावा केल्या होत्या.

पुढील तीन सामन्यात रैनाने 53, 66 आणि 52 धावांची खेळ्या केल्या आहेत. विजय हजारे ट्राॅफीत रैनाने सहा सामन्यात 208 धावा केल्या आहेत.

सुरेश रैना त्याचा शेवटचा वन-डे  ह्याच वर्षी जुलै महिन्यात खेळला आहे.

त्यानंतर झालेल्या एशिया कप स्पर्धेत  त्याला संघात निवडण्यात आले नव्हते. त्याला  इंग्लडच्या दौऱ्यात यो-यो चाचणीत अपात्र ठरलेल्या अंबाती रायडूच्या जागी सामील करण्यात आले होते.

त्याच्या खेळीने निवड समितीचे लक्ष लागले असणार आहे. त्यामुळे  विंडीजविरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी त्याचा विचार होऊ शकतो.

रैनाने जरी वैयक्तिक कामगिरी चांगली केली असली तरी कर्णधार म्हणुन त्याला विजय हजारे ट्राॅफीत त्याच्या संघाची कामगिरी खराब झाली आहे. उत्तर प्रदेशच्या संघाने खेळलेल्या सात सामन्यांपैकी 6 सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे.

भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाजी ही चिंतेची बाब आहे. केदार जाधव देखील दुखापतग्रस्त झाल्याने विंडीजविरुद्ध रैनाला संधी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment