---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफी २०२१: युवा अनुज रावतने मिळवून दिले दिल्लीला ‘क्वार्टर फायनल’चे तिकीट

---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या एलिनिमेटरमध्ये दिल्लीने उत्तराखंडचा अटीतटीच्या सामन्यात ४ गडी राखून पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत जागा पटकावली. उद्यापासून (८ मार्च) उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होतील.

दिल्लीचा रोमांचक विजय
विजय हजारे ट्रॉफी २०२१ च्या नवीन प्रारुपानुसार आपापल्या एलिट गटात अव्वलस्थानी राहिलेल्या ५ संघांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले होते. तसेच, सर्वोत्तम धावगती असलेल्या दोन संघांदेखील उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले. त्यानंतर, उर्वरित एका जागेसाठी प्लेट गटातील विजेता उत्तराखंड संघ व चांगली धावगती राखलेल्या दिल्ली संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला.

या सामन्यात उत्तराखंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर कमल सिंग व कर्णधार कुणाल चंदेलाने अर्धशतके साजरी केली. यष्टीरक्षक सौरभ रावतने २३ चेंडूत ४४ धावा ठोकून उत्तराखंडला २८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. दिल्लीकडून कर्णधार प्रदीप सांगवानने तीन बळी मिळविले.

प्रत्युत्तरात, दिल्लीची अवस्था ५ बाद ८४ अशी नाजुक झाली होती. मात्र, अनुभवी नितीश राणाने ८१ धावांची जबाबदारीपूर्वक खेळी केली‌. अखेरीस, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक अनुज रावतने कर्णधार प्रदीप सांगवानसोबत १४३ धावांची नाबाद खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. अनुजने ६ षटकार व ७ चौकारांच्या मदतीने ८५ चेंडूंमध्ये नाबाद ९५ तर, सांगवानने नाबाद ५८ धावांची खेळी केली. या विजयासह दिल्लीची उपांत्यपूर्व फेरीची जागा पक्की झाली.

विजय हजारे ट्रॉफी २०२१ उपांत्यपूर्व फेरी-

उपांत्यपूर्व फेरी १ (८ मार्च)
गुजरात विरुद्ध आंध्र प्रदेश

उपांत्यपूर्व फेरी २ (८ मार्च)
कर्नाटक विरुद्ध केरळ

उपांत्यपूर्व फेरी ३ (९ मार्च))
दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश

उपांत्यपूर्व फेरी ४ (९ मार्च)
मुंबई विरुद्ध सौराष्ट्र

महत्वाच्या बातम्या:

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

जो रुटचे मोठे मनं! पराभवानंतरही भारताला दिल्या कसोटी चॅम्पियशीपसाठी शुभेच्छा; म्हणाला

जयसूर्याचे लाजवाब क्षेत्ररक्षण पाहून लाराला आवरला नाही कौतुक करण्याचा मोह, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---