कोरोनामुळे यंदा जवळपास सर्वच क्रिकेट स्पर्धांना उशीर झाल्यामुळे रणजी करंडक रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी प्राधान्य देण्यात आले ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला. भारतात नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली. तमिळनाडूने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर आता विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला २० फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार असून १४ मार्च पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी या कार्याक्रमची घोषणा केली ज्यात त्यांनी सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सुरत, इंदोर, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर ह्या प्रमुख शहरात ही स्पर्धा खेळावली जाणार असून प्लेट ग्रुपचे आठ संघाचे सामने हे तामिळनाडूच्या विविध मैदानावर खेळवले जातील.
मुश्ताक अली स्पर्धेचा विचार केल्यानंतर या ठिकाणांवर स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे समजते, परंतु अहमदाबाद येथे भारत आणि इग्लंड यांच्यातील सामने होणार असल्याने कोलकातामधील ईडन गार्डन किंवा मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये बाद तसेच अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण स्पर्धेचे लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल.
या स्पर्धेसाठी खेळाडूंना १३ फेब्रुवारीला बायो-बबलमध्ये यावे लागेल आणि त्यांनतर त्यांना तीन वेळा कोविड-१९ ची चाचणी करावी लागेल. बीसीसीआय प्रोटोकॉलनुसार या खेळाडूना त्यांच्या बायो-बबलमध्ये सामील होण्यापूर्वी तीन आरटी – पीसीआर चाचण्या कराव्या लागणार असून त्यांना ७ मार्च पासून सुरु होणाऱ्या बाद फेरीच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या आगोदर देखील ही चाचणी करायची आहे.
बीसीसीआयच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटात खेळणारे संघ
एलिट ग्रुप ए – गुजरात, चंदीगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा, गोवा
ग्रुप बी- तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
ग्रुप सी – कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिसा, रेल्वे आणि बिहार
ग्रुप डी -दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पॉंडिचेरी
ग्रुप ई- बंगाल,सेना, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरियाणा आणि चंदिगड
प्लेट ग्रुप – उत्तराखंड, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि सिक्कीम
महत्त्वाच्या बातम्या –
Video : …आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले
“तेव्हा जो रुटने मला विचारले होते त्याला कोणताच आयपीएल संघ का निवडत नाही”