क्रिकेटविश्वात आजकाल मैदानातील खेळाडूच्या कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील कृत्यामुळेही बऱ्याचदा चर्चा होत असते. असाच दिल्लीतील एक क्रिकेटपटूच्या मारहाणीचे प्रकरण सध्या चर्चेत असून या क्रिकेटपटूचे नाव विकास टोकस आहे. विकास आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग राहिलेला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
झाले असे की, २६ जानावारी रोजी दिल्ली पोलिसांनी जबरदस्त मारहाण केल्याचा आरोप विकासने केला आहे. या मारहाणीदरम्यान त्याच्या डोळ्याला मोठी दुखापत झाल्याचे त्याने सांगितले आहे. त्याबद्दल विकासने दिल्ली पोलिस हेड क्वार्टरमध्ये तक्रार नोंदवली आहे.
विकासच्या म्हणण्यानुसार २६ जानेवारीला त्याच्या गावाच्या जवळच्या काही पोलिसांनी त्याची कार आडवली आणि मास्क न घातल्याचा आरोप करत २ हजार रुपयांची मागणी केली. या मागणीला त्याने विरोध केला, पण त्यानंतर पोलिस त्याच्या कारमध्ये बसले आणि त्याला शिवीगाळ केला. यावेळी एका पोलिसाने त्याला जोरदार मुक्का मारला. तसेच पोलिस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेले. त्यांनी त्याच्यावर रायफल घेऊन पळून जाण्याचा आरोपही केला आणि त्याचा फोनही काढून घेतला.
याबरोबरच विकासने असेही म्हणले आहे की, पोलिस स्टेशनमधील एका कर्मचारीने त्याच्याशी तडजोड करण्याचाही प्रयत्न केला. तसेच त्याने डीएसपी आणि सीपी यांना ईमेल करत मुक्का मारणाऱ्या एका पोलिसाला आणि आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा – मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली सारी कारकीर्द घालवलेला नयन मोंगिया
विकासचे आरोप चूकीचे – डीएसपी गौरव शर्मा
दुसरीकडे, दक्षिण पश्चिम जिल्ह्याचे डीएसपी गौरव शर्मा यांच्या म्हणण्यानुसार विकासने लावलेले आरोप चूकीचे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विकासला चेकिंगसाठी थांबवण्यात आले आहे. त्यानंतर त्याने तो राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू आहे आणि असे असताना त्याला थांबवण्याची हिंमत कशी होते, असे म्हणत त्याने गैरव्यवहार करण्यात सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणताना डोळ्याच्या खाली जखम झाली.
या प्रकरणात आता पोलिस हेड क्वार्टरने चौकशीचे आदेश दिले आहेत.
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
विकासची कारकिर्द
विकासने आपल्या कारकिर्दीत १५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ११ अ दर्जाचे सामने खेळताना १९ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १७ टी२० क्रिकेट सामने खेळताना १६ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०१६ साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्लॅशबॅक! १६ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पाहा व्हिडिओ
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
रवी शास्त्रींचा द्रविडला मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘जर भविष्याचा विचार करत असाल, तर…’