न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडला 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिका जी ग्रेटर नोएडा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केली जाईल. दरम्यान किवी संघाने आशियामध्ये येताच दोन दिग्गज प्रशिक्षकांना आपल्या संघाचा भाग बनवले आहे.
किवी संघाने श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथची आशिया खंडातील आगामी तीन कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हेराथने सकलेन मुश्ताकची जागा घेतली आहे. श्रीलंकेच्या हेराथची गणना कसोटी स्वरूपातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्या नावावर कसोटीत 433 विकेट्स आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याच कारणामुळे ब्लॅककॅप्सने तिथल्या देशांतर्गत गोलंदाजाला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.
नोएडा येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने टीम इंडियाचा माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर याचाही समावेश केला आहे. नुकताच टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राठाैरचा कार्यकाळ संपला होता. 2024 मध्ये भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, रंगना हेराथ आणि राठाैर संघाला केवळ नवीन माहितीच देणार नाहीत तर देशांतर्गत परिस्थितीची माहितीही देतील. यावेळी बोलताना तो म्हणाला, रंगना आणि विक्रम आमच्या कसोटी संघात सामील झाल्याने आम्ही खूप उत्साहित आहोत. क्रिकेट जगतात दोन्ही खेळाडूंचा खूप आदर केला जातो आणि मला माहित आहे की आमचे खेळाडू त्यांच्याकडून शिकण्याच्या संधीची वाट पाहत आहेत. आमच्या तीन डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकीपटूंना, विशेषत: इजाज, मिच आणि रचिन यांना उपखंडातील तीन कसोटी सामन्यांमध्ये रंगनासोबत काम करण्याची संधी मिळणे खूप फायदेशीर ठरेल. रंगनाने कसोटी फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. आमचा संघ या मैदानावर दोन्ही कसोटी सामने खेळणार आहे आणि त्यामुळे त्या खेळपट्टीबद्दलचे त्यांचे ज्ञान हे आमच्यासाठी अनमोल असेल.
हेही वाचा-
‘राहुल भाई विनम्र होता, पण गौतम खूप…’, पाहा मुख्य प्रशिक्षकांच्या कोचिंगमधील फरक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामनावीर
Duleep Trophy; हर्षितचं सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशन पुन्हा भोवणार? चाहत्यांचा आक्रोश!