कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २२ मे पासून विंसी प्रीमियर टी१० लीगची सुरुवात झाली. या लीगमधील ९वा सामनाला सॉफ्रीयर हायकर्स आणि सॉल्ट पाँड ब्रेकर्स या संघात रविवारी (२४ मे) खेळण्यात आला. दरम्यान सॉल्ट पाँड ब्रेकर्सने हायकर्सला २५ धावांनी पराभूत करत सामना जिंकला.
ब्रेकर्सने दिलेल्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हायकर्स (La Soufriere Hikers) संघाला १० षटकांत ५ बाद १०७ धावाच करता आल्या. यावेळी हायकर्स संघाकडून फलंदाजी करताना डिलन डग्लसने (Dillon Douglas) सर्वाधिक ४७ धावा केल्या. यावेळी ब्रेकर्सकडून गोलंदाजी करताना वेसरिक स्ट्रोने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच डेलॉर्न जॉनसनने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी ब्रेकर्सने (Salt Pond Breakers) एकही विकेट न गमावता १३२ धावा केल्या होत्या. त्यावेळी कर्णधार सुनील अँब्रिसने (Sunil Ambris) ४० चेंडूंचा सामना करत सर्वाधिक नाबाद ७५ धावांची खेळी केली. यामध्ये ४ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश आहे. तसेच कादिर नेडने (Kadir Nedd) २२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यात ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे.
ब्रेकर्सने विंसी प्रीमियर लीगमधील सर्वात्कृष्ट धावसंख्या करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या विजयाबरोबरच ब्रेकर्स संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांचे ३ सामन्यात ६ गुण आहेत. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. तर हायकर्सने केवळ एकवेळा पराभवाचा सामना केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिनला शुन्यावर बाद करणाऱ्या ‘त्या’ गोलंदाजाने सांगितली संपुर्ण कहानी
-हा परदेशातील खेळाडू तासंतास पहातो धोनीच्या फलंदाजीचे व्हीडिओ
-इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितला शाहरुख खानबरोबर सामना पहाण्याचा अनुभव