मुंबई । कोरोना महामारीमुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आल्या होत्या. नुकतेच फुटबॉलनंतर आता क्रिकेटच्या सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडीजमध्ये विन्सी प्रीमियर टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. यात सहा संघांचा समावेश आहे. मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडीजमध्ये दर्शकांच्या विना हा सामना खेळवण्यात आला. तब्बल 50 दिवसांच्या नंतर खेळवण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त हॅट्ट्रिक पाहायला मिळाली.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या या लीगमध्ये सलग दहा दिवस रोज तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना सॉल्ट पॉन्ड ब्रेकर्स आणि ग्रेनाडाइंस डाइवर्स यांच्यात झाला. ब्रेकर्सच्या संघाने 3 विकेटने विजय मिळविला. या सामन्यात डाइवर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना10 षटकात 68 धावा केल्या. ब्रेकर्स संघाकडून वेसरिक स्ट्रग ने चांगली गोलंदाजी करत स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नावावर केली. ब्रेकर संघाने हे आव्हान तीन गडय़ांच्या मोबदल्यात 71 धावा काढून विजय मिळवला.
विंसी प्रीमियर लीग मध्ये संघमालकांनी ११ मे रोजी संघ निवडले गेले. ज्यात 72 खेळाडूंचा समावेश आहे. लीगमध्ये सहा संघ खेळत असून दहा दिवस चालणाऱया स्पर्धेत एकूण 30 सामने होणार आहेत. या स्पर्धेत वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघातून खेळणारे केसरिक विलियम्स, सुनील ऐम्ब्रिस अाणि ओबेड मैकॉय हे विविध संघातून खेळत आहेत.