सर्बियातील बेलग्राड येथे सुरू असलेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या पदकांचे खाते खोलले. ग्रीक रोमन प्रकाराच्या कुस्ती पार पडल्यानंतर, सुरू झालेल्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय महिला कुस्तीपटू व ट्रिपल कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट विनेश फोगटने कांस्यपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत दोन वेळा पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू बनली. 2019 मध्येही तिने कांस्य पदकच आपल्या नावे केले होते.
#WrestleBelgrade WW 53kg medal bouts results
🥇 Dominique PARRISH 🇺🇸 df. Khulan BATKHUYAG 🇲🇳, 4-2
🥉 Vinesh PHOGAT 🇮🇳 df. Jonna MALMGREN 🇸🇪, 8-0
🥉 Maria PREVOLARAKI 🇬🇷 df. Lucia YEPEZ 🇪🇨, 14-4— United World Wrestling (@wrestling) September 14, 2022
मागील महिन्यात बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेशने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या स्पर्धेतही तिच्याकडून अशीच अपेक्षा होती. मात्र, तिला अनपेक्षितपणे पराभवास सामोरे जावे लागले. तिला पहिल्या सामन्यात मंगोलियाच्या खुलान बटखुयाग हीने 7-0 असे पराभूत केले. मात्र, बटखुयाग अंतिम फेरीत पोहोचल्याने विनेश रेपचेज राऊंड खेळून कांस्यपदकाची लढत खेळू शकत होती.
रेपचेजच्या कांस्य पदकाच्या लढतीत युरोपियन विजेत्या स्वीडनच्या जोना मालग्रेनचा 8-0 असा पराभव करत कांस्य पदक जिंकले. 2019 मध्ये नूर सुलतान येथे झालेल्या स्पर्धेतही ती कांस्यच जिंकलेली.
विनेश व्यतिरिक्त भारताची युवा कुस्तीपटू निशा दहिया देखील 68 किलो वजनी गटात रेपचेज राऊंड खेळण्यासाठी पात्र ठरलेली. मात्र, तिला उपांत्य फेरीत जपानच्या एमी इशीने 5-4 अशा अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पराभूत केले. आपल्या पहिल्याच जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले.
यावेळी भारतीय संघाला ऑलिंपिक विजेत्या बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, साक्षी मलिक यांच्याव्यतिरिक्त अंशू मलिक, सरिता मोर व रितिका यांच्याकडून पदकाची अपेक्षा असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…