विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (19 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यासह ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा विश्वचषक किताब जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले, पण अंतिम सामन्यात भारताच्या हाती निराशा लागली. भारताच्या या पराभवानंतर भारताच्या काही चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबांना ऑनलाइन शि’वीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला अंतिम सामन्यात एकतर्फी लोळवले. त्यानंतर काही भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर लक्ष्य केले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याची पत्नी विनी रमन हिने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत खुलासा केला. तिने लिहिले,
Instagram post of Glenn Maxwell's wife, Vini Raman. pic.twitter.com/1QAzwdndKk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 20, 2023
‘हे सर्व लोक जे द्वेषपूर्ण संदेश पाठवत आहेत, त्यांनी थोडी काळजी घ्या. अशा गोष्टी सांगायलाही हव्यात यावर विश्वास ठेवणे मला अवघड जाते. तुम्ही एक भारतीय आहात, तुमचा जन्म जिथे झाला, जिथे तुम्ही वाढलात आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ज्या देशासाठी तुमचा पती आणि मुलाचे वडील खेळतात, त्या देशाचे समर्थन करू शकताच. थोडी विश्रांती घ्या आणि तुमच्यात भरलेल्या या द्वेषाचा उपयोग इतर महत्त्वाच्या मुद्द्यासाठी करा.’
Instagram Post Of Glenn Maxwell's Wife, Vini Raman Shows The Vile And Abusive Nature Of So Called Nationalists.
Even Wife And 1Year Old Daughter Of Travis Head Recd. Rape Threats In Comments After #Australia Won The #Worldcupfinal2023 Against #India
What Laurels For The Country pic.twitter.com/Ggb2u3RLxK
— ਹਤਿੰਦਰ ਸਿੰਘ (@Hatindersinghr3) November 20, 2023
विनी ही जन्माने भारतीय असून तिचे व मॅक्सवेलचे लग्न हे देखील भारतीय पद्धतीनेच पार पडले होते. विनीप्रमाणेच अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या ट्रेविस हेड याच्या पत्नी व एका वर्षाच्या मुलीबाबत देखील अशाच प्रकारची काही आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली आहेत. तसेच मी चल मार्च याच्या कुटुंबीयांना देखील अशाच प्रकारे सोशल मीडियावर संदेश पाठवले गेले आहे.
(Vini Raman wife of Australian cricketer Glenn Maxwell, has also received threats and verbal abuse from Indian cricket fans same With head wife and daughter)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून…
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर