---Advertisement---

गायक बनला विनोद कांबळी! चाहत्यांसाठी गायले ‘हे’ भक्तीगीत, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 4:23 PM
---Advertisement---

भारतात सध्या आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. सर्व चाहते क्रिकेटच्या या रंगारंग प्रारूपात जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू नशिब आजमावत आहेत. आयपीएलचे समालोचन यावेळी भारतातील तब्बल आठ भाषांमध्ये केले जातेय. मराठी समालोचकांच्या पॅनलमध्ये भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याचादेखील समावेश आहे. त्याचवेळी, कांबळीने आपले ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विनोद कांबळीचा ट्विटरवर व्हिडिओ
भारतासाठी १७ कसोटी व १०४ वनडे खेळलेला विनोद कांबळी सध्या आयपीएलमध्ये मराठी समालोचकाची भूमिका निभावत आहे. तसेच, तो सोशल मीडियावर देखील सातत्याने व्यस्त असतो. त्याने नुकताच आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्यातील गायन कौशल्ये सर्वांना दाखवतोय. कांबळीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो प्रसिद्ध मराठी भक्तीगीत ‘ओमकार स्वरूपा’ गाताना दिसत आहे.

कांबळीने या व्हिडिओला कॅप्शन देताना, ‘मराठी कॉमेंट्रीच्या चाहत्यांनो हे तुमच्यासाठी आहे.’ असे लिहिले. त्याने या ट्विटमध्ये सहसमालोचक अमोल मुजुमदार याला देखील टॅग केले आहे. कांबळीच्या या नव्या कौशल्याला चांगलीच पसंती लाभताना दिसतेय.

मराठी समालोचनाला मिळतेय पसंती
आयपीएल २०२१ मध्ये प्रथमच मराठी समालोचन करण्यात येत आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या ‘डिस्नी हॉटस्टार’ वर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. मराठी समालोचन करणाऱ्या समालोचकांमध्ये विनोद कांबळीसह १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य संदीप पाटील, अमोल मुजुमदार व स्नेहल प्रधान या खेळाडूंसह कुणाल दाते, चैतन्य संत व प्रसन्ना संत यांचा समावेश आहे. मराठी समालोचनाला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती लाभताना दिसतेय.

भारताचा माजी क्रिकेटपटू आहे विनोद कांबळी
मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर विनोद कांबळीने भारतीय संघासाठी १७ कसोटी सामन्यात ५४ पेक्षा जास्तच्या सरासरीने १०८४ तर, १०४ वनडेमध्ये २४७७ धावा केल्या आहेत. १९९६ क्रिकेट विश्वचषकात उपांत्य सामना रद्द झाल्यानंतर त्याचा रडवेला चेहरा चाहते अजूनही विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

हैदराबादच्या धाकड फलंदाजांविरुद्ध ‘अशी’ होती किंग कोहलीची रणनिती, शाहबाजच्या रुपात वापरले ‘सिक्रेट पॅकेज’

उमेश यादव RRला दाखवणार इंगा! नेट्समध्ये टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा एकहाती झेल, बघा व्हिडिओ

कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---