भारतात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. हा खेळ खेळण्यासाठी जितका आनंददायी आहे तितकाच तो जीवघेना देखील ठरू शकतो. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे, ज्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दिल्लीच्या गाझियाबादमध्ये एक घटना घडली होती, जी पाहून क्रिकेट चाहते हादरून गेले होते. तर झाले असे की, फलंदाज चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला होता. फलंदाजाने चेंडू मारला आणि तो चेंडू थेट जाऊन गोलंदाजाच्या डोक्याला लागला होता. तो शॉट इतका जोरदार होता की, गोलंदाजाच्या डोक्याला चेंडू लागताच तो जमिनीवर पडला. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. ही सर्व घटना तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकाने कॅमेऱ्यात कैद केली होती.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. लोकांना वाटू लागले होते की तो गोलंदाज मृत पावला आहे. परंतु तो गोलंदाज जिवंत असून त्याने स्वत:च सर्वांना याची माहिती दिली आहे.
Bowler hit after batsman strikes ball straight at his head https://t.co/Ok5IzyEpEI via @MailOnline
— Shubham (@Shubham91216059) April 17, 2021
त्या गोलंदाजाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला की, “मला काहीच झाले नाहीये. मी जिवंत आहे. चेंडू लागल्यानंतर माझा मृत्यू झाला आहे अशी खोटी बातमी पसरवली जात आहे. मी काही वेळ बेशुद्ध होतो. मी व्यवस्थित आहे, फक्त माझं मध्ये मध्ये डोकं दुखतं. लवकरच सिटीस्कॅन करण्यात येणार आहे. बाकी सर्व व्यवस्थित आहे. ”
यापूर्वी चेंडू लागून मृत्यु झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा २५ वर्षीय फलंदाज, फिलिप ह्यूज याच्या मानेला चेंडू लागून मृत्यू झाला होता. या घटनेने क्रिकेट विश्व हादरून गेले होते. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या शेल्फिल्ड शिल्ड सामन्यात ह्यूज ६३ धावांवर खेळत होता. तसेच न्यू साऊथ वेल्स संघाचा गोलंदाज सिन एबोटने टाकलेल्या एका बाऊन्सर चेंडूवर ह्यूजने हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो चेंडू त्याच्या मानेला लागून तो जमिनीवर पडला होता. त्यानंतर रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्याचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-