---Advertisement---

‘आई शप्पथ तो बाद आहे’; जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाजाने पंचांकडे केला होता बालहट्ट

---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कधी काय होईल याचा पूर्वानुमान लावता येत नाही. या खेळात मैदानावर अनेक मजेशीर किस्से घडतात. तसेच खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी हवं ते करण्यासाठी तयार असतात. अनेकदा खेळाडूंनी पंचांसोबत वाद केल्याचेही दिसून आले आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माजी भारतीय गोलंदाज लक्ष्मी रतन शुक्ला याने भावनिक अपील केली असता पंचांनी बाद घोषित केले होते.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत २०१४ साली तामिळनाडू आणि बंगाल या दोन्ही संघांमध्ये एक सामना पार पडला होता. या सामन्यात शुक्लाने अशी काही अपील केली होती, ज्यामध्ये त्याने पंचांपुढे चक्क आईची शप्पत घेतली होती.

तर झाले असे की, बंगालचा गोलंदाज शुक्लाने टाकलेला चेंडू फलंदाजांच्या पॅडला जाऊन लागला होता. त्यावेळी शुक्लाने जोरदार मागणी केली होती. परंतु ती मागणी पंचांनी फेटाळून लावली होती. पंचांनी नकार दिल्यानंतर शुक्लालाही आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. त्याने मागणी करताना लहान मुलासारखा हट्ट धरला होता. इतकेच नव्हे तर, त्याने ‘आई शप्पथ, तो बाद आहे’ असे देखील म्हटले होते. त्यानंतर पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले होते.

Laxmi ratan shukla appealing - Maa kasam out hai,Maa kasam out hai

लक्ष्मी रतन शुक्लाची कारकीर्द
लक्ष्मी रतन शुक्ला हा देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, आतापर्यंत एकूण १३७ सामन्यात २.७९ च्या इकॉनॉमीने १७२ गडी बाद केले आहेत. यासोबतच ६२१७ धावा देखील केल्या आहेत. तसेच टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ८१ सामन्यात ९९४ धावा केल्या आहेत. यात त्याने ४७ गडी देखील बाद केले आहेत.

त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची देखील संधी मिळाली होती. परंतु त्याला ३ वनडे सामन्यात अवघ्या १८ धावा आणि १ विकेट्सची कामगिरी करण्यात यश आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

सोन्यासारखी संधी! केवळ ‘इतक्या’ विकेट्स अन् अश्विन बनेल टेस्ट चॅम्पियनशीपचा अव्वल गोलंदाज 

माजी कर्णधाराचा आपल्याच संघावर अविश्वास; म्हणे, ‘पाकिस्तान वगळता ‘हे’ संघ टी२० विश्वचषकाचे मानकरी’

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची दुरावस्था, कोरोनामुक्त होऊनही म्हणतोय अजूनही बाधित असल्यासारखं वाटतंय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---