इंग्लंड क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज टॉम बॅंटन याला 2021 काउंटी चॅम्पियनशिपमध्ये फारशी उत्तम फलंदाजीमुळे करता आली नाही. जागतिक क्रिकेटमधील भविष्यातला स्टार मानल्या जाणाऱ्या बॅंटनला स्थानिक क्रिकेटमध्ये अशाप्रकारचा संघर्ष करावा लागत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेषत: इंग्लंड क्रिकेट वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान बॅंटनने या सर्व बाबींबद्दल एक वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
बॅंटनने स्पष्ट केले की, त्याला अजूनही वाटते की, तो कोरोनाच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही. बॅंटनला मार्च महिन्यामध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत असताना कोरोनाची बाधा झाली होती. बॅंटन याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. बॅंटन हा 3 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.
बॅंटन म्हणाला, “मला अजूनही कोरोना असल्यासारखे जाणवते आहे. माझी वास आणि चव ओळखण्याची क्षमता अद्याप फारशी चांगली नाही. ही बाब थोडी विचित्र तसेच थोडीशी चिंताजनक देखील आहे. त्याचा धावांवरही परिणाम होऊ शकतो. पण त्याव्यतिरिक्त बाकी ठीक आहे.” बॅंटनला विश्वास आहे की आगामी काळात तो शानदार कामगिरी करेल.
बॅंटनच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा विचार केला असता त्याने इंग्लंडकडून 9 टी20 व 6 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. यादरम्यान बॅंटनने टी20 सामन्यात 22.77 च्या सरासरीने 205 धावा केलेल्या आहेत. बॅंटनने अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 26.80 च्या सरासरीने 134 धावा केलेल्या आहेत. दरम्यान बॅंटनसारख्या उत्तम क्षमता असलेल्या खेळाडूकडून आगामी काळात सर्वच क्रिकेटप्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाच्या जुन्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
इंग्लंड दौऱ्यानंतर संपू शकते ‘या’ भारतीय खेळाडूंची कसोटी कारकीर्द
वसीम जाफरने शेअर केले चक्क पाकिस्तानी पंतप्रधानांचे मिम, पाहा काय आहे प्रकरण