जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता तीन आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ १८ ते २२ जून दरम्यान हा सामना एजबॅस्टन येथे खेळतील. सुरुवातीला हा सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळण्याचे ठरलेले मात्र काही कारणास्तव हे ठिकाण बदलावे लागले. हा सामना एजबॅस्टनला खेळविण्यात येणार असल्याने भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भारतीय संघाच्या दृष्टीने पाहण्यास गेले तर खेळाडू तंदुरुस्त आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेले सर्व खेळाडू या सामन्यासाठी उपलब्ध असतील. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ या सामन्यात सर्वात मजबूत संघ उतरवेल. मात्र, एजबॅस्टनच्या मैदानावर भारतीय संघाचा इतिहास विसरण्यासारखा आहे. भारतीय संघाने या मैदानावर आजतागायत एकही सामना जिंकला नाही.
दोन वेळा भारताला पाहावे लागले पराभवाचे तोंड
भारताला एजबॅस्टनच्या मैदानावर पहिला पराभव २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात स्वीकारावा लागला होता. त्या संघात विद्यमान कर्णधार विराट कोहली हादेखील खेळत असत. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला केवळ ३३० धावा बनवता आल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात २०५ धावा करून डाव घोषित केला व भारतासमोर ४४५ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाला हे आव्हान पेलले नाही व २६६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.
विराट कोहलीचा नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ मध्ये या मैदानावर पराभवाचे तोंड पाहिले आहे. यावेळी इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना केवळ २४६ धावा करता आल्या. भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने शतक ठोकले. मात्र, इतर फलंदाज त्याची साथ देऊ शकले नाहीत व भारताला नाममात्र आघाडी मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात २७१ धावा बनवून भारतासमोर विजयासाठी २४५ धावांचे लक्ष ठेवले. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक अर्धशतके ठोकली. मात्र, बाकीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने, भारताला या सामन्यात देखील ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
वसीम जाफरने शेअर केले चक्क पाकिस्तानी पंतप्रधानांचे मिम, पाहा काय आहे प्रकरण
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाच्या जुन्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल
श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी