इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जो संघ ही कसोटी जिंकेल त्यास मालिकेतील विजयी आघाडी घेण्यास वाव असेल. या दरम्यान विराटच्या नेतृत्त्व गुणांची देखील चर्चा होतांना दिसत आहे.
चौथ्या कसोटी सामन्यातील इंगडच्या पहिल्या डावादरम्यान मोईन अली आणि ऑली पोप फलंदाजी करत होते. अलीने 70 चेंडूंचा सामना करत 35 धावा केल्या होत्या. तो खेळपट्टीवर स्थिर होतांना दिसत असताना विराटने अष्टपैलू रविंद्र जडेजाकडे चेंडू दिला आणि त्यास आपला मास्टरप्लान सांगितला. लेग साईड आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक यात बदल कण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली.
यानंतर जडेजाने चेंडू टाकताच मोईन अलीने चेंडू उंच टोलवण्याच्या नादात रोहित शर्माकडे झेल दिला आणि तंबूत माघारी परतला. अशाप्रकारे विराट आणि जडेजाची ही योजना कामी लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.
https://twitter.com/pranjal__one8/status/1433801855415422984?s=20
तत्पूर्वी, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नव्हती. भारताचे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते. केवळ विराटने अर्धशतकीय खेळी करत थोडीफार झुंज दिली होती. जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरी, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र आक्रमक फलंदाजी करत ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता.
प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर संपला होता. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावात ९९ धावांची आघाडीही घेतली आहे. भारताकडून उमेश यादवने तीन विकेट्स घेतल्या. तर बुमराह आणि जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय सिराज आणि शार्दुल ठाकूरच्या खात्यात १-१ विकेट्स आल्या. भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत आणि आता ते इंग्लिश संघाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून ५६ धावांनी मागे आहेत. रोहित २० तर केएल राहुल २४ धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सीएसके, सीएसके…’, मोईनला पाहून भारतीय चाहत्यांची नारेबाजी; अष्टपैलूही झाला ‘असा’ रिऍक्ट
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा
रोहितचा झेल तर क्लास होताच; पण त्यानंतर कोहली, पंत अन् राहुलने केलेले सेलिब्रेशन पाहिले का?