---Advertisement---

रोहितच्या संगीत सोहळ्यात विराटने सोनाक्षी सिन्हासोबत केलेला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मासाठी १३ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी रोहित शर्मा आपली प्रेयसी रितिका सजदेहसोबत विवाह बंधनात अडकला होता. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. आता विवाह करून ६ वर्ष उलटली आहेत. या खास दिवशी अनेक चाहत्यांनी आणि क्रिकेटपटूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नसोहळ्यातील विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहली हा मैदानावर नेहमी आक्रमक भूमिकेत दिसून येत असतो. त्याच्या फलंदाजीसमोर दिग्गज गोलंदाज देखील गुडघे टेकतात. परंतु, फलंदाजी व्यतिरिक्त विराट किती चांगला डान्स करतो, हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो रोहित शर्माच्या संगीत कार्यक्रमात डान्स करताना दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराटने पांढऱ्या रंगाचा पठाणी स्टाईल कुर्ता पायजमा घातला आहे. तो बॉलिवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबत, ‘साडी के फॉल सा कभी मॅच किया रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. त्यानंतर तो एका पंजाबी गाण्यावर देखील थिरकताना दिसून येत आहे.

विराट कोहली हा आपल्या डान्ससाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. त्याचे डान्स करत असतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच रोहित शर्माच्या विवाह सोहळ्याबद्दल बोलायचं झालं, तर अनेक बॉलिवुड कलाकार आणि क्रिकेटपटूंनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये सलमान खान, सोहेल खान, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, शिखर धवन, प्रज्ञान ओझा, राहुल शर्मा यांचा समावेश होता.

तसेच रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. रितिका आधी रोहित शर्माची मॅनेजर होती. रितिकाला भेटल्याबद्दल त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तो शूटिंग करत होता, त्यावेळी त्याच्याकडे मॅनेजर नव्हता. अशा स्थितीत त्याला खूप त्रास होत होता. हे पाहून रितिकाने त्याला मदत केली आणि त्यानंतर दोघेही जवळ आले. आणि नंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांना समायरा नावाची लहान मुलगी देखील आहे.

महत्वाच्या बातम्या :

टी२० विश्वचषक सामन्यात नाणेफेकीवेळी विराटसोबत काय बोलणं झालं? बाबर आजमचा खुलासा

करारा जवाब! टीकाकारांची तोंडे बंद करत वॉर्नरने पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार

कपिल देव यांची १९८३ विश्वचषकातील इंग्रजी ऐकून व्हाल लोटपोट, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---