टीम इंडिया सध्या टी-20 विश्वचषक 2024 साठी न्यूयॉर्कमध्ये आहे. विराट कोहलीही टीम इंडियासोबत आहे. आयर्लंडविरुद्ध कोहलीला विशेष कामगिरी करता आली नाही चो सामन्यात लवकर बाद झाला. आता तो रविवारी 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात दिसेल. याआधी कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत दिसत आहे. कोहलीच्या कुटुंबाचा हा व्हिडिओ न्यूयॉर्कच्या हॉटेलमधील आहे.
A few days before Virushka and Vamika were spotted at the Team Hotel 🥰❤️ pic.twitter.com/kv6uBSPJti
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 7, 2024
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर एका यूजर ने व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली आनुष्का आणि मुलगी वामिकाचे हाथ पकडून हाॅटेलकडे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ टीम इंडियाच्या हाॅटेल मधील आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे. कोहलीच्या कुटुंबीयांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने अनेकदा कोहलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रांवर 67 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. तर कोहलीला 269 दशलक्ष लोक फॉलो करतात.
भारतीय संघ टी20 विश्वचषकात चार साखळी सामने खेळणार आहे. पहिल्या सामन्यात इंडियाने आयर्लंड विरुद्ध सामना एकतर्फी जिंकला होता. आता 9 जून रोजी दुसरा सामना पाकिस्तान तर पुढचा सामना यजमान अमेरिका विरुद्ध न्यूयाॅर्क येथे होणार आहे. तर शेवटचा सामना कॅनडा विरुद्ध फ्लोरिडा य़ेथे खेळले जाणार आहे. विराट कोहली बद्दल बोलायचे झाले तर , आयपीएल 2024 मध्ये त्याने चांगली कामगिरी केला होती. ज्यामध्ये तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता त्याने 15 सामन्यात 741 धावा केल्या होत्या, पण मात्र कोहलीची आगामी विश्वचषकात निराशाजनक सुरुवात झाली आहे. आयर्लंड विरुद्ध सामन्यात केवळ 1 धाव काढू शकला होता. पण पाकिस्तानच्या सामन्यासाठी किंग कोहलीवर सर्व भारतीय चाहत्यांची नजर आहे.
महत्तवाच्या बातम्या-
सौरभ नेत्रावळकरला कोडिंग आवडते का? वेगवान गोलंदाजानं स्वत: केला खुलासा, म्हणाला…
भारत पाकिस्तान सामन्यात टाॅस ठरणार निर्णायक! 2007 पासून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावला आहे सामना
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis