शनिवारी(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही एक खास विक्रम केला आहे. या सामन्यात विराटने 29 चेंडूत 19 धावा केल्या. याबरोबरच तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याच्या आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 68 सामन्यात 49.60 च्या सरासरीने 2282 धावा झाल्या आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसरे स्थान मिळवताना न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टिलच्या 2272 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने शनिवारी 24 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 95 सामन्यात 32.26 च्या सरासरीने 2355 धावा झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
2355 – रोहित शर्मा (95 सामने)
2282 – विराट कोहली (68 सामने)
2272 – मार्टिन गप्टील (76 सामने)
2263 – शोएब मलिक (111 सामने)
2140 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२०मध्ये असा पराक्रम करणारा नवदीप सैनी जगातील चौथाच गोलंदाज
–टीम इंडियाला अलविदा केल्यानंतर आता पॅट्रिक फऱ्हार्ट करणार या आयपीएल संघाबरोबर काम
–विराट कोहली-रोहित शर्मामधील ही शर्यत जिंकणार कोण?