---Advertisement---

टी२०मध्ये असा पराक्रम करणारा नवदीप सैनी जगातील चौथाच गोलंदाज

On: रविवार, ऑगस्ट 4, 2019 7:00 AM
---Advertisement---

शनिवारी(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात युवा गोलंदाज नवदीप सैनीने 3 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

नवदीप सैनीने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्या या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. याबरोबर त्याने वेस्ट इंडीजच्या डावातील शेवटचे म्हणजेच 20 वे षटक निर्धाव टाकले. या षटकात त्याने किरॉन पोलार्डची विकेटही घेतली.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका डावातील 20 वे षटक निर्धाव टाकणारा सैनी हा पहिला भारतीय तर जगातील केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे.

याआधी 2008 मध्ये न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू जीतन पटेलने वेस्ट इंडीज विरुद्धच 20 वे षटक निर्धाव टाकले होते. त्यानंतर 2010 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 वे षटक निर्धाव टाकले होते. तसेच याचवर्षी सिंगापूरच्या जनक प्रकाशने कतार विरुद्ध 20 वे षटक निर्धाव टाकले होते.

विशेष म्हणजे जनकनेही त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20मधील पदार्पणाच्या सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच त्यानेही 20 वे षटक निर्धाव टाकताना विकेट घेतली होती.

शनिवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला 20 षटकात 9 बाद 95 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. वेस्ट इंडीजकडून फक्त किरॉन पोलार्डने 49 धावांची चांगली झूंज दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यानंतर 96 धावांचा पाठलाग भारतीय संघाने 6 विकेट्स गमावत 17.2 षटकात पूर्ण केला.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 20वे षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज – 

जीतन पटेल – न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज, 2008

मोहम्मद अमीर – पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2010

जनक प्रकाश – सिंगापूर विरुद्ध कतार, 2019

नवदीप सैनी – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहली-रोहित शर्मामधील ही शर्यत जिंकणार कोण?

या कारणामुळे भारत-विंडीज संघातील पहिला टी२० सामना होऊ शकतो रद्द…

आज २४ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment