---Advertisement---

मयांक अगरवालमुळे लाईव्ह सामन्यात चढला विराटचा पारा; ‘ही’ गोष्ट ठरली रागाला कारणीभूत

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 8:57 AM
Virat and mayank
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर (१२ जानेवारी) भारतीय संघाने ७० धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू असताना मयांक अगरवाल याने (Mayank Agarwal) असे काही कृत्य केले, ज्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली भलताच चिडला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की दक्षिण आफ्रिका संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू होती. त्यावेळी किगन पीटरसनने (Keegan Peterson)  जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बॅकफुट पंच शॉट खेळला. त्यानंतर मयांक अगरवालने त्या चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडूपर्यंत पोहोचला. परंतु, त्याला स्लाइड करून चेंडू हाताने दूर फेकण्यात उशीर झाला. ज्यामुळे या चेंडूवर दक्षिण आफ्रिका संघाला ४ धावा मिळाल्या.

मयांक अगरवाल एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. परंतु, त्याच्याकडून अशी चूक घडली, हे विराट कोहलीला (Virat Kohli)  आवडले नाही. परिणामी विराट कोहली संताप व्यक्त करताना दिसून आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) देखील विराट कोहलीचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मयांक अगरवालकडे भरपूर वेळ होता.

https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1481219525614108678

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २२३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये कर्णधार कोहलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव २१० धावांवर संपुष्टात आला आहे. ज्यामध्ये किगन पीटरसनने ७२ धावांची खेळी केली. आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची धावसंख्या दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ५७ अशी आहे. विराट कोहली १४ तर चेतेश्वर पुजारा ९ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात आतापर्यंत ७० धावांची आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या :

सुट्टी असल्यासारखं वाटतंय’, म्हणत पूर्ण हंगाम बाकावर बसवलेल्या बीबीएल संघाची उन्मुक्तने उडवली खिल्ली

लखनऊ, अहमदाबाद फ्रँचायझींचा अधिकृत मंजूरी, पण खेळाडू निवडण्यासाठी मिळणार किती वेळ? घ्या जाणून

हे नक्की पाहा:

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---