सध्या जगभरातील क्रिकेट दिग्गजांमध्ये विराट कोहलीच्या फॉर्मवरून चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गजांकडून विराट कोहलीवर टीका केली जात आहे, तर अनेक जण विराटची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने विराट कोहलीला पाठबळ देणारे ट्वीट गुरुवारी रात्री शेअर केले होता. आता त्या ट्वीट वरून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू शाहिद आफ्रिदीने विराटला सुनावले आहे.
बाबरच्या ट्विटला विराटने उत्तर द्यायला हवे होते, असे शाहिद आफ्रिदीचे मत आहे. तसे केल्यास भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर संबंध अधिक दृढ झाले असते. आफ्रिदी म्हणाला की, “राजकारण्यांपेक्षा खेळाडू दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगल्या पद्धतीने सुधारू शकतात.” बाबरच्या ट्विटला उत्तर म्हणून विराटने ट्विट केले तर ती मोठी गोष्ट असेल, पण आफ्रिदीला तसे होईल असे वाटत नाही.
बाबर आझमच्या ट्विटला विराट कोहलीने आत्तापर्यंत उत्तर द्यायला हवे होते, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. तसे केले असते तर दोन्ही देशांतील संबंध सुधारले असते. यासोबतच त्याने विराटकडून उत्तराची अपेक्षा नसल्याचेही म्हटले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करत विराटचे समर्थन केले होते. विराटच्या खराब फॉर्मवर त्याने लिहिले की, “ही वेळही निघून जाईल.”
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कोहलीच्या बॅटमधून एकही शतक पाहायला मिळालेले नाही. या शिवाय विराट सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या संपूर्ण मालिकेत विराटने आत्तापर्यंत एक कसटी, दोन टी२० आणि १ एकदिवसीय सामना खेळला आहे. यांपैकी त्याला फक्त एकदाच २० धावांपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे विराटचा खराब फॉर्म सध्या भारतीय संघाच्या चिंतेचा विषय बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सचा धुरंधर TNPL मध्ये घालतोय धुमाकूळ, सूर्यकुमार यादवचं वाढवतोय टेंशन
‘विराटबाबत कपिल देव बोलले ते योग्यच’, असे म्हणत पाकिस्तानच्या दिग्गजाने कोहलीवर साधला निशाना
‘विराटच्या दुखण्यावर फक्त सचिनच करू शकतो मलमपट्टी’, जडेजाचे मोठे विधान