भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. लिसेस्टर येथे सुरू असलेला सामना चार दिवस खेळला जाणार आहे. गुरूवारी (२३ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत. या सामन्यातील तिसऱ्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपण चांगल्या फॉर्मात परतत असल्याचे संकेत दिले.
विराटने तिसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावर ९८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारासह ६७ धावा केल्या. तो पुर्ण नियंत्रणात खेळताना दिसला. पण या खेळीतील त्याचा एक षटकार दिवसाचे आकर्षण ठरला. तिसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या विराटने भारताचाच वेगवान गोलंदाज बुमराह याला टी२० अंदाजात एक षटकार मारला. विराटने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर थर्डमॅन आणि डीप पॉइंटच्या दरम्यान हा अप्पर कट मारला, ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
Kohli upper-cuts Bumrah for a six – great battle. pic.twitter.com/Liq7exq4sb
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2022
पहिल्या डावात विराटने ६९ चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या डावात त्याचा आत्मविश्वास हळूहळू परतत असल्याचे त्याने दाखवून दिले. पहिल्या डावात २४६ धावा करणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ७ बाद ३६४ धावा केल्या आहेत. विराटने ९८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावा केल्या.
युवा फलंदाजांना अधिक सराव देण्यासाठी विराट शनिवारी दुसऱ्या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला, त्यानंतर राखीव यष्टीरक्षक एस. भरतला डावाची सलामी देण्यासाठी पाठवण्यात आले. आणि त्याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. शुभमन गिलने २८ धावा केल्या, त्यानंतर हनुमा विहारी (२०) आणि श्रेयस अय्यर (२०) यांनीही आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला, पण रवींद्र जडेजा खातेही उघडू शकला नाही, त्यामुळे कोहलीसमोर फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरने २८ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद