बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे.
या 149 धावांच्या शतकी खेळीत विराटने 225 चेडूंचा सामना करत 1 षटकार 22 चौकार लगावले.
या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी (2 आॅगस्ट) भारताचा पहिला डाव 76 षटकात 274 धावांवर संपूष्टात आला. यामध्ये एकट्या विराटचे 149 धावांचे योगदान आहे. तर उर्वरित संघाला फक्त 125 धावा करता आल्या. यामध्ये विराट नंतर सर्वाधिक 25 धावा शिखर धवनने केल्या आहेत.
तसेच बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर शतक करणारा विराट कोहली भारताचा दुसराच फलंदाज ठरला आहे.
भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सचिन आणि विराट वगळता बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर एकाही भारतीय फलंदाजाला शतक करता आले नाही.
पहिल्या डावात भारताची आघाडीचे फळी कोसळत असताना विराटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत अप्रतिम खेळी केली केली आहे.
एकवेळ इंग्लंड भारतावर मोठी आघाडी मिळवण्याची शक्यता असताना विराटच्या कर्णधार पदाला साजेशी खेळीने इंग्लंडचा भ्रमनिरास केला.
तर यापूर्वी 1996 साली तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 6-10 जून दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सचिनने 122 धावांची शतकी खेळी केली होती.
या 122 धावांच्या शतकी खेळीत सचिनने 177 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 17 चौकार लगावले होते.
विराटप्रमाणेच त्यावेळी सचिनने भारताचा कोलमडलेला डाव सावरला होता. या दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद 219 धावा केल्या होत्या. त्या 219 धावांपैकी 122 धावा एकट्या सचिनच्या होत्या. तर सचिन नंतर दुसऱ्या डावात सर्वाधिक 18 धावा संजय मांजरेकरने केल्या होत्या.
या सामन्यात सचिनची ही जिगरबाज खेळी मात्र भारताच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त
-सचिन-कांबळी जोडीची करामत, गांगुलीच्या रुममध्ये झाले पाणीच पाणी…