अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात चालू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना (2nd ODI) बुधवारी (९ फ्रेबुवारी) झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी वैयक्तिकदृष्टीने खास ठरला. तो या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विराटचे खास शतक पूर्ण
बुधवारी झालेला सामना विराटसाठी भारतात खेळलेला १०० वा वनडे सामना होता. भारतात १०० वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार करणारा तो एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि युवराज सिंग यांनी असा कारनामा केला आहे.
सचिनने सर्वाधिक १६४ वनडे भारतात खेळले आहेत, तर एमएस धोनीने १३० वनडे सामने भारतात खेळले आहेत. तसेच मोहम्मद अझरुद्दीन यांनी ११३ आणि युवराजने १११ वनडे सामने भारतात खेळले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोनी आणि युवराजने भारतात खेळलेल्या एकूण वनडे सामन्यांपैकी प्रत्येकी ३ सामने आशियाई एकादश संघासाठी खेळले आहेत. म्हणजेच धोनीने १३० पैकी १२७ सामने, तर युवराजने १११ पैकी १०८ सामने भारतासाठी भारतात खेळले आहेत.
विराटने सचिनला टाकले मागे
विराटचा १०० वा सामना धावांच्या दृष्टीने फारसा चांगला राहिला नाही. तरी त्याने एका विक्रमात सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विराट ३० चेंडूत १८ धावा करून बाद झाला. त्यामुळे आता भारतातील १०० वनडे सामन्यात विराटच्या नावावर ५९.०५ च्या सरासरीने ५०२० धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या १९ शतकांचा आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचमुळे मायदेशातील पहिल्या १०० वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम विराटच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिनने भारतातील पहिल्या १०० वनडेत ४२४५ धावा केल्या होत्या. म्हणजेच विराटने याबाबतीत सचिनला ७७५ धावांनी मागे टाकले आहे.
मायदेशातील पहिल्या १०० वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
५०२० धावा – विराट कोहली
४२४५ धावा – सचिन तेंडुलकर
३७५१ धावा – डिन जोन्स
३७४२ धावा – रॉस टेलर
३६६४ धावा – तमिम इक्बाल
३६१९ धावा – एमएस धोनी
महत्त्वाच्या बातम्या –
पाचव्यांदा अंडर १९ WC जिंकून यंगिस्तान भारतात दाखल, आज रंगणार सन्मान सोहळा
आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी
INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर