कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या संयमाची परीक्षा पाहिली जाते. परंतू क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत जे या संयमाच्या परीक्षेला सामोरे जाताना सतत उत्तीर्ण होत गेले. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून धावा करणे जेवढे कठीण आहे, त्याहीपेक्षा कर्णधार असताना धावा जमविणे महाकठीण.
अनेक कर्णधारांना संघाच्या चांगल्या कामगिरीच्या दबावामुळे हे करता आलेले नाही. परंतू काही कर्णधार असेही झाले ज्यांनी मात्र कसोटीत कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आला आहे. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेक उत्कृष्ट डाव खेळले आहेत. या लेखात तुम्हाला विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या ३ मोठ्या खेळींबद्दल सांगू.
कसोटी कारकीर्दीत विराट कोहलीने ३ सर्वात मोठा डाव खेळले-
३. विराट कोहली (Virat Kohli) – इंग्लंड विरुद्ध २३५ धावा
विराटचा हा डाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ८ डिसेंबर २०१६ रोजी त्याने मुंबई येथे इंग्लंडविरुद्ध २३५ धावांची जबरदस्त खेळी केली होती. या खेळीने एमएस धोनीचा भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम विराट कोहलीने मोडला.
त्या सामन्यात विराट कोहलीने ३४० चेंडूंत २५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ही धावसंख्या केली होती. भारतीय संघाने तो सामना डाव आणि ३६ धावांनी जिंकला होता.
२. विराट कोहली (Virat Kohli) – श्रीलंका विरुद्ध २४३ धावा
डिसेंबर २०१७ मध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा श्रीलंकेविरूद्ध दुहेरी शतक झळकावले होते. हा तोच सामना आहे ज्यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिल्ली मध्ये झालेल्या प्रदूषणामुळे खेळण्यास नकार दिला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने केवळ २८७ चेंडूत २५ चौकारांच्या मदतीने २४३ धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला होता.
१. विराट कोहली (Virat Kohli) – दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद २५४ धावा
भारतीय कर्णधार म्हणून कसोटी सामन्यातील सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहलीने केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यात त्याने नाबाद २५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार ठोकले.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळलेला हा सामना भारताने डाव आणि १३७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा






