एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात १०८ चेंडूत १०० धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते तेव्हा विराटलाही वर्षाची सुरुवात चमकदार करता आली नव्हती. त्यानंतर त्याने दुसऱ्याच सामन्यात त्याने जबरदस्त कमबॅक केला.
दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत विराटने एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६० सामन्यात ६४ शतके केली आहेत.
कुमार संगकाराने ५९४ सामन्यात ६३ शतकं केली आहे.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ ७१ शतकांसह ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटींग आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू:
100 – सचिन तेंडुलकर
71 – रिकी पॉंटींग
64* – विराट कोहली
63 – कुमार संगकारा
62 – जॅक कॅलिस
महत्त्वाच्या बातम्या –
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास
–मोहम्मद सिराजचे झाले टीम इंडियाकडून वनडे पदार्पण