‘मिस्टर 360’ अशी ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने रविवारी(17 फेब्रुवारी) 35 वा वाढदिवस साजरा केला. त्याचा हा वाढदिवस बंगळूरुमध्ये त्याच्या चाहत्यांनीही एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की चाहत्यांनी डिविलियर्स आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक केला आहे.
डिविलियर्स आणि विराट हे दोघेही 2011 पासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकत्र खेळतात. आयपीएलमुळे डिविलियर्सचा मोठा चाहतावर्ग भारतात आहे. त्याचाच प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो.
चाहत्यांनी विराट आणि डिविलियर्सच्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक केलेला हा व्हिडिओ बेंगलोर संघाच्या अधिकृत ट्विटर हँडेलनेही रिट्विट केला आहे.
https://twitter.com/mafiapraveen/status/1097134262178836480
डिविलियर्स आणि विराट हे बेंगलोर संघातील एकमेकांचे फक्त संघसहकारीच नसून मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. या दोघांनी बेंगलोरकडून एकत्र खेळताना अनेक मोठ्या भागिदाऱ्या रचल्या आहेत.
तसेच आयपीएलमध्ये सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा विक्रमही या दोघांच्याच नावावर आहे. या दोघांनी मिळून गुजरात लायन्स विरुद्ध 2016 मध्ये 229 धावांची भागीदारी रचली होती.
मात्र अजूनही बेंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यांना 2009, 2011 आणि 2016 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
डिविलियर्सने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो जगभरातील विविध लीग स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळे तो 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातही बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट, रोहित आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये हा आहे मोठा फरक
–पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी बातमी
–२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती