रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे संघसहकारी विराट कोहली आणि एबी डिविलियर्सने शुक्रवारी (२४ एप्रिल) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधला. या सेशन दरम्यान विराट आणि डिविलियर्सने कोरोना व्हायरस दरम्यान जीवनासोबतच आरसीबी संघामध्ये घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांबद्दलही चर्चा केली आहे.
याचदरम्यान विराट (Virat Kohli) आणि डिविलियर्सने (AB De Villiers) आपल्या भारत-दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त ११ जणांच्या वनडे संघाचीही निवड केली आहे.
डिविलियर्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सलामीवीर म्हणून निवडले असता, विराटने दुसरा सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड केली आहे.
विशेष म्हणजे विराट आणि डिविलियर्सने अनुक्रमे स्वत:लाच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे. यानंतर या दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) या खेळाडूंना निवडले.
विराट आणि डिविलियर्सने या वनडे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी धोनीकडे सोपविली आहे. याव्यतिरिक्त विराटने गोलंदाजी करण्यासाठी फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) निवड केली. तर डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) आणि कागिसो रबाडाची (Kagiso Rabada) निवड केली आहे.
विराट आणि डिविलियर्सने आपल्या वनडे संघाचे कर्णधारपद भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीकडे (MS Dhoni) सोपविले आहे. तर गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.
विराटने या संयुक्त अकरा जणांच्या वनडे संघाचा कर्णधार धोनीच्या निवडीवर म्हटले की, “कदाचित माझ्यासाठी सर्वात संतुलित निवड हा धोनी आहे.” तर डिविलियर्सने धोनीच्या निवडीवर म्हटले की, “धोनीला निवडल्यामुळे मी खुश आहे. मी कधीच धोनीच्या नेतृत्वात खेळलो नाही. परंतु तो ज्याप्रकारे मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर वागतो, त्यामुळे मी त्याचा आदर करतो. तो नेहमी शांत राहतो आणि क्रिकेट खूप चांगल्याप्रकारे समजतो. त्यामुळे मी त्याला निवडल्यामुळे खुश आहे.”
या दोन्ही खेळाडूंनी कुलदीप यादव, रविंद्र जडेजा आणि मॉर्ने मॉर्केल या खेळाडूंनाही आपल्या संघात निवडले. परंतु त्यांंना अकरा जणांच्या वनडे संघात स्थान दिले नाही.
असा आहे विराट आणि डिविलियर्सचा भारत-दक्षिण आफ्रिका संयुक्त अकरा जणांचा वनडे संघ-
सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, जॅक कॅलिस, युवराज सिंग, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा.
ट्रेंडिंग घडामोडी-
-केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण
-ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू म्हणतो, मला करायची होती आत्महत्या
-रोहित शर्मा म्हणतो, कमीतकमी २ विश्वचषक नक्की जिंकू