ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयाचे खुप कौतुक झाले. जगभरातील खेळाडूंनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मालिका सुरू होण्यापूर्वी भारत ही मालिका जिंकणार नाही, असा अंदाज काही खेळाडूंनी वर्तविला होता. पण त्यांना चुकीचे उत्तर देत भारतीय संघाने ही मालिका आपल्या पदरात पाडून घेतली.
या विजयानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने भारतीय संघाला सावध देखील केले होते. त्याने आपल्या सोशल मीडियावर हिंदीमध्ये ट्विट केले होते की, “जास्त उत्सव साजरा करू नका कारण काही आठवड्यातच इंग्लंड देखील भारतात येणार आहे” त्याच्या याट्विट नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला ट्रोल देखील तितक्याच प्रमाणत केले होते.
पण आता केविन पिटरसन याने काही दिवसांपूर्वीच एका टीव्हीशो वर बातचीत करताना भारतीय संघाबद्दल सकारात्मक बाजू मांडली, त्याच म्हणणं आहे की ह्या वेळी इंग्लंड खूप सामर्थ्यवान संघ आहे. परंतु जगातील सर्वात मोठा संघ म्हणून भारतचे असे वर्णन केले जात आहे. इंग्लंडला भारतीय संघ पराभूत करेल असे मत देखील त्याने मांडले.
पुढे तो म्हणाला की भारताला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडे विराट कोहली सारखा अनुभवी खेळाडू देखील आहे. आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लडने सर्वोत्तम संघ निवडला नाही आहे, जॉनी बेअरस्टोला संघात घ्यायला हवे होते, तो देखील उत्तम खेळतो. अजिंक्य रहाणे हा उपकर्णधारपदाच्या भूमिकेत असल्यामुळे कोहली आणि रहाणेची उत्कृष्ट जुगलबंदी देखील या सामन्यात पाहण्यासारखी आहे.
तसेच तो म्हणाला, कोहली, अँडरसन आणि रहाणे ही अशी नावे आहेत ज्यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी या मालिकेत चर्चेत राहिल.
भारताची नवीन भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराबद्दल देखील तो म्हणाला की, “इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर आहे पण तो पुजाराला बाद करू शकेल का का असा प्रश्न देखील आहे. बुमराह परत आला आहे, त्यामुळे त्याची कामगिरी पाहावी लागेल. या मालिकेत बऱ्याच अशा गोष्टी घडणार आहेत, ज्यावर खूप भाष्य केले जाईल.”
इंग्लंडचा कर्णधार आणि श्रीलंकेमध्ये केलेल्या शानदार कामगिरी केलेल्या जो रूटबद्दल आणि त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना पीटरसन म्हणाला की, तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि खेळीसुद्धा उत्कृष्ट खेळेल. परंतु, त्याचसोबत पीटरसनने आपल्या संघाच्या सलामीवीरांच्या तंत्रावर देखील चिंता व्यक्त केली आहे. केवळ बेन स्टोक्सवर अवलंबून न राहता सर्वांनी चांगलं खेळलं पाहिजे असे देखील पीटरसनने सांगितले.
त्याचबरोबर पीटरसनने आर अश्विन, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे वर्णन सुपस्टार म्हणून केले आहे.
केविन पीटरसनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०४ कसोटी १३६ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी सामन्यात मिळून तीस हजारांपेक्षा जास्त धावा आहेत. २०१४ सालचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतला पाचवा कसोटी सामना हा त्याच्या कारकीर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानी तीन कसोटी आणि बारा वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडच नेतृत्व केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ
आर्चरला भारतीय फलंदाजांचे आले टेंशन; म्हणाला, नंबर ६ पर्यंत कोणीही ठोकू शकतात शतक
निवृत्ती घेतल्यानंतर डिंडाने मानले सौरव गांगुलीचे आभार; म्हणाला, ‘दादाने मला नेहमीच…’