अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने काल(24 ऑगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली 51 धावांवर आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 53 धावांवर नाबाद खेळत आहेत.
या दोघांनी दुसऱ्या डावात चौथ्या विकेटसाठी नाबाद 104 धावांची भागीदारी केली आहे. यामुळे त्यांनी एक खास विक्रम रचला आहे. विराट आणि रहाणेच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी 8 व्यांदा कसोटीमध्ये शतकी भागीदारी रचली आहे.
त्यामुळे कसोटीत भारताकडून चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी करण्याचा विक्रम विराट आणि रहाणेच्या जोडीने केला आहे.
हा विक्रम करताना त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिन आणि गांगुलीच्या जोडीने कसोटीत चौथ्या विकेटसाठी 7 वेळा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.
अँटिग्वा येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजला 75 धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे.
भारताकडून कसोटीत चौथ्या विकेटसाठी सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या –
8 – विराट कोहली-अजिंक्य रहाणे
7 – सचिन तेंडूलकर-सौरव गांगुली
6 – सचिन तेंडूलकर-मोहम्मद अझरुद्दीन
5 – राहुल द्रविड-सौरव गांगुली
4 – व्हीव्हीएस लक्ष्मण-सचिन तेंडूलकर
4 – दिलीप वेंगसरकर-गुंडप्पा विश्वनाथ
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का
–अरुण जेटलींच्या निधनानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत वाहिली श्रद्धांजली