Loading...

अरुण जेटलींच्या निधनानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज(24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील एम्स(AIIMS) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट जगतातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

जेटली हे 1999 ते 2012 या दरम्यान दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन(डीडीसीए)चे अध्यक्ष होते. या 13 वर्षांमध्ये दिल्लीच्या अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये विरेंद्र सेहवाग,गौतम गंभीर, इशांत शर्मा, विराट कोहली अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. सेहवागने ट्विट केले आहे की ‘अरुण जेटलींच्या निधनाचे वाईट वाटले. त्यांनी दिल्लीच्या खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमीका बजावली आहे.’

‘त्यावेळी असा एक काळ होता जेव्हा दिल्लीच्या अनेक खेळाडूंना उच्च स्तरावर संधी मिळत नव्हती. पण त्यांच्या डीडीसीएच्या नेतृत्त्वाखाली माझ्यासह अनेकांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.’

‘ते खेळाडूंच्या गरजा ऐकून घ्यायचे आणि समस्या सोडवायचे. त्यांच्याबरोबर माझे वैयक्तिक खूप चांगले संबंध होते. माझी प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहे. ओम शांती.’

Loading...

त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत म्हटले आहे की ‘श्री अरुज जेटलींच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते एक चांगले व्यक्ती होते. तसेच मदतीसाठी नेहमी तयार असायचे. जेव्हा 2006मध्ये माझ्या वडीलांचे निधन झाले तेव्हा ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

Loading...

भारताचा माजी फलंदाज आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने म्हटले आहे की ‘एक वडील तूम्हाला बोलायला शिकवतात पण वडीलांसमान व्यक्ती तूम्हाला बोलण्याची कला शिकवतात. एक वडील तूम्हाला चालायला शिकवतात पण वडीलांसमान व्यक्ती तूम्हाला पुढे जायला शिकवतात.’

‘एक वडील तूम्हाला नाव देतात तर पण वडीलांसमान व्यक्ती तूम्हाला ओळख देते. माझ्या वडीलांसमान व्यक्ती असणाऱ्या अरुण जेटलींसह माझ्यातील एक भाग निघून गेला आहे. सर तूमच्या आत्म्यास शांती लोभो.’

याबरोबरच अनेक खेळाडूंनी ट्विटरवरुन अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

विकेट्सचे ‘अर्धशतक’ पूर्ण करताच बुमराहचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत इशांत शर्माने केली हरभजन, कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी

का झाला एमएस धोनी राजकीय नेता, जाणून घ्या यामागील खरे कारण

You might also like
Loading...