Loading...

विकेट्सचे ‘अर्धशतक’ पूर्ण करताच बुमराहचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात काल(23 ऑगस्ट) दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डॅरेन ब्रावोला 18 धावांवर पायचीत केले. बुमराहची ही कसोटीमधील ही 50 वी विकेट ठरली आहे. याबरोबरच त्याने एक खास पराक्रम केला आहे.

बुमराहचा हा कसोटी कारकिर्दीतील 11 वा सामना आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्सचा टप्पा पार करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. प्रसाद आणि शमीने कसोटीमध्ये 50 विकेट्सचा टप्पा प्रत्येकी 13 सामन्यात पूर्ण केला होता.

तसेच कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्सचा टप्पा पार करणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराहने तिसऱ्या क्रमांकावर विभागून असणाऱ्या हरभजन सिंग आणि नरेंद्र हिरवानींची बरोबरी केली आहे. हरभजन आणि हिरवानी यांनीही प्रत्येकी 11 कसोटी सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

या यादीत अव्वल क्रमांकावर फिरकीपटू आर अश्विन असून त्याने 9 सामन्यात 50 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता. तर दुसऱ्या स्थानावर अनिल कुंबळे आहे. कुंबळेने 10 कसोटी सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या.

सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 8 बाद 189 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या आहेत.

Loading...

#कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज- 

11 सामने – जसप्रीत बुमराह

13 सामने – वेंकटेश प्रसाद / मोहम्मद शमी

14 सामने – इरफान पठाण / एस श्रीसंत

Loading...

16 सामने – केरसन घावरी / कपिल देव

#कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

9 सामने – आर अश्विन

10 सामने – अनिल कुंबळे

Loading...

11 सामने – नरेंद्र हिरवानी / हरभजन सिंग / जसप्रीत बुमराह

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत इशांत शर्माने केली हरभजन, कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी

का झाला एमएस धोनी राजकीय नेता, जाणून घ्या यामागील खरे कारण

Loading...

काय सांगता! एकाच टी२० सामन्यात शतक आणि ८ विकेट्स, भारताच्या कृष्णप्पा गॉथमचा पराक्रम

You might also like
Loading...