क्रीडाविश्वात प्रत्येक खेळाडूचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात जर क्रिकेटमध्ये आयपीएल या लीगबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये स्वत: ला त्या- त्या संघाचा, खेळाडूचा चाहता म्हणवून घेण्यासाठी प्रत्येकाचीच चढाओढ लागलेली असते. अशीच चढाओढ आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे धुरंदर एबी डिविलियर्स आणि विराट कोहली यांच्यासाठीही आहे.
याचा प्रत्यय सोशल मीडियावरील एका पोस्टने आला आहे. विराट आणि डिविलियर्सच्या एका चाहत्याने त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये विराट आणि डिविलियर्सचे क्षेत्ररक्षण आणि धडाकेबाज फलंदाजीचा जलवा दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने त्यांना टॅग करत आणि जर्सीचा क्रमांक लिहित आपला जन्म त्यांची खेळी पाहण्यासाठीच झाला आहे, असे लिहिले आहे.
https://twitter.com/TheKantri/status/1311198516488728576
हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून त्याला १५० पेक्षा अधिक रिट्वीट आणि ३०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.१९ च्या सरासरीने ५४३० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ३६ अर्धशतके ठोकली आहेत, तर डिविलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४४ च्या सरासरीने ४५२९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत.