भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघावर विजयी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, पावसाने या सामन्यात अडथळा निर्माण केला. परिणामी एकही चेंडूचा खेळ न झाल्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. ज्यामुळे कर्णधार कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २७८ धावा केल्या होत्या. या डावात कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला होता. तर अजिंक्य रहाणे देखील अवघ्या ५ धावा करून धावबाद होऊन माघारी परतला होता.
दुसऱ्या डावात इंग्लंडने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची सुवर्ण संधी होती. परंतु दुसऱ्या डावात पावसामुळे या दोघांना फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही.(Virat Kohli and Ajinkya Rahane,’ performance in test for India)
या दोघांची कामगिरी गेल्या काही सामन्यांपासून खास अशी राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.
विराट कोहलीची कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपले शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. परंतु, त्यानंतर १५ डाव उलटून गेले आहेत. तरी देखील त्याला एकही शतक झळकावण्यात यश आले नाही. गेल्या १५ डावात त्याने अवघे ३ अर्धशतक झळकावले आहेत. यादरम्यान तो ३ वेळेस शून्य धावांवर माघारी परतला आहे. त्यामुळे विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघाच्या चिंतेत वाढ करू शकतो.
अजिंक्य रहाणेची कामगिरी
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या ५ धावा केल्या होत्या. त्याची निराशाजनक कामगिरी पाहून त्याला संघांबाहेर करा अशी देखील मागणी केली जाऊ लागली आहे.
रहाणेच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला गेल्या १३ डावात एकही शतक झळकावण्यात यश आले नाही. यादरम्यान त्याने अवघे १ अर्धशतक झळकावले आहे. त्याने आपले शेवटचे शतक २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावण्यात यश आले नाही.
महत्वाच्या बातम्या –
अँडरसनने कोहलीला ‘गोल्डन डक’ वर बाद केल्याचे पाहून दिग्गज इंग्लिश खेळाडूला झाला भलताच आनंद; म्हणाला…