---Advertisement---

वामिकाला २ महिने पूर्ण, विराट-अनुष्काने ‘खास’ अंदाजात केले सेलिब्रेशन; फोटो व्हायरल 

On: शुक्रवार, मार्च 12, 2021 12:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. ‘विरुष्का’ नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या या जोडीला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत असतं. त्यांची केल वामिका हिला २ महिने पूर्ण झाले आहेत. अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या गोष्टीची माहिती दिली. यावेळचे त्यांचे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर वेगान व्हायरल होत आहेत.

कोहली आणि अनुष्का यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्ती झाली होती. या गोष्टीची गोड बातमी देखील त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. तिचे नाव त्यांनी ‘वामिका’ असे ठेवले होते. वामिका आता २ महिन्यांची झाली आहे. या गोड दिवसाला आणखी गोड बनवण्यासाठी दोघांनी केक कापून आनंद साजरा केला आहे.

अनुष्काने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने केकचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शन म्हणून तिने लिहिले आहे की “आम्हाला दोन महिने पूर्ण होण्याच्या शुभेच्छा.” याबरोबरच कोहलीने देखील अनुष्कासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/_heavenlyInsane/status/1369959075690201096?s=20

https://www.instagram.com/p/CMSHnCfFRVM/?utm_source=ig_web_button_share_sheet

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही २०१९ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या आयुष्यात वामिकाने आगमन केले होते. या बाबतची माहिती विराट कोहलीने सोशल मीडियावर दिली होती.

त्याने लिहिले होते की, “आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत. आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला आयुष्यातील ही गोष्ट अनुभवायला मिळाली. आम्हाला माहीत आहे की, तुम्ही समजून घ्याल आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल.”

महत्त्वाच्या बातम्या-

मिताली राजचा ‘दशहजारी’ विक्रम! कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर 

कसं काय बरं? असंही आऊट होतं का कुणी? श्रीलंकेच्या खेळाडूला विवादास्पद निर्णय देत ठरवले बाद; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---