---Advertisement---

विराट-अनुष्काने स्वित्झर्लंडवरून दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पहा व्हिडिओ…

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 7:00 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विराटने मंगळवारी (31 डिसेंबर) आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “तुम्हा सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” विराट आणि अनुष्काने हा व्हिडिओ सुंदर पर्वतांमध्ये रेकाॅर्ड केला आहे.

https://www.instagram.com/p/B6vOmqrlkbI/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओत दिसतंय की, हे दोघेही बर्फाने झाकलेल्या पर्वतावर उभे आहेत.

एकदिवसापूर्वी विराटने स्वत: चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचबरोबर त्याने या फोटोसाठी अनुष्काला ‘सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर’चे श्रेय दिले होते.

तसेच त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की, “जेव्हा तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर असतो तेव्हा तुम्हाला फोटोंची चिंता नसते.”

https://twitter.com/imVkohli/status/1211973609758973952

विराट आता 5 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka)  सुरू होणाऱ्या 3 सामन्यांची टी20 मालिकेत (3 Matches of T20 Series) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना गुवाहाटी (Guwahati) येथे सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---