इंग्लंडच्या साउथम्पटन येथील द रोज बाउल स्टेडियमवर आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. कसोटी इतिहासातील या मोठ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आमनेसामने होते. पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययामुळे राखीव दिवसावर गेलेल्या या सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली. ८ विकेट्सने भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडचे तब्बल २१ वर्षांनंतर आयसीसी चषक उंचावला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसीच्या एका निर्णयावर विरोध दर्शवला आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना सुरु होण्यापूर्वीच ‘बेस्ट ऑफ थ्री’चे भाष्य केले होते. त्यांचे म्हणणे होते की, केवळ एका सामन्यावरुन कसोटी अजिंक्यपदचा विजेता न ठरवता. ३ सामन्यांच्या मालिकेद्वारे हा निर्णय घेतला जावा.
भारतीय संघाचा कर्णधार कोहलीचा विचार वेगळा आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने सांगितले की, “आम्ही झालेल्या सामन्याबद्दल जास्त विचार करत नाही आहोत. केवळ एका सामन्याने सर्वश्रेष्ठ संघ कोण हे ठरवता येत नाही. यासाठी ‘बेस्ट ऑफ थ्री’सारखा पर्याय वापरावा. यामध्ये जो बाजी मारेल तोच खरा सर्वश्रेष्ठ संघ असेल. केवळ एका सामन्यामुळे जगतील सर्वश्रेष्ठ संघ कोण या बाबतीत मी सहमत नाही. जर कसोटीत सर्वोत्तम संघ निवडायचा असेल तर, त्यासाठी कसोटी मालिका हा उत्तम पर्याय आहे.”
कोहलीने सांगितले की, “महत्त्वाचे, आम्ही अंतिम सामना हारलो आहे म्हणून हे बोलतोय असे अजिबात नाही. भविष्यात या गोष्टीवर विचार केला पाहिजे. बेस्ट ऑफ थ्री खेळताना एखादा सामना हरल्यावर तुम्हाला दुसऱ्या सामन्यात चूक सुधारण्याची संधी मिळते. आम्ही गेली ३-४ वर्ष चांगले कसोटी क्रिकेट खेळत आलो आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या दोन दिवसांच्या खेळीवर कोणीही आमची योग्यता आणि क्षमता ठरवू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात वॅटलिंगने अव्वल यष्टीरक्षक धोनीला पछाडलं, मोडला ‘हा’ विक्रम
सुवर्णसंधी गमावली! WTC अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे ‘इथे’ही मोठे नुकसान
मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक