भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर मोहम्मद सिराज याचा किती जीव आहे, हे सर्वश्रुत आहे. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यातील जबरदस्त बाँड क्रिकेटच्या मैदानावरही पाहायला मिळतो. सिराजशी जेव्हाही चर्चा होते, तेव्हा तो प्रत्येकाला विराट ही आपली प्रेरणा असल्याचे सांगतो. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विराट कोहली मोहम्मद सिराज आणि त्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे. विराटव्यतिरिक्त आरसीबीचा संपूर्ण संघ सिराजच्या घरी पोहोचला.
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील आरसीबी (RBC) संघाचा 13वा सामना 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीच्या इतर खेळाडूंसोबत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या नवीन घरी पोहोचला. मोहम्मद सिराजचे नवीन घर (Mohammed Siraj New House) पाहण्यासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्यासोबतच संघातील नवा खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) हादेखील दिसला.
आरसीबीने फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “ही हैदराबादी बिर्याणीची वेळ आहे.”
Hyderabadi Biryani time! 🥳
The boys took a pitstop at Miyan's beautiful new house last night! 🏡#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/kEjtB1pQid
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2023
फाफ डू प्लेसिससोबत वेन पार्नेल हादेखील यावेळी सिराजच्या घरी हजर होता. आरसीबी संघाचा पुढील सामना हैदराबादमध्येच होणार आहे. त्यामुळे संपूर्ण संघ सिराजच्या घरी पोहोचला आहे. यादरम्यान विराट कोहली काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला.
आरसीबीचा शानदार विजय
आरसीबीने त्यांचा मागील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता. यामध्ये त्यांनी 112 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ 10.3 षटकात 59 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे बेंगलोरने हा सामना सहज जिंकला होता.
गुणतालिकेत पाचव्या स्थानी बेंगलोर संघ
राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवताच आरसीबी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला. संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यातील 6 सामन्यात विजय, तर 6 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. संघाला प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी दोन सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतरही संघाला लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. आता हे पाहणे रंजक ठरेल की, आरसीबी संघ प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय करू शकतो की नाही. (virat kohli and his rcb teammates reached mohammed siraj s new house before match against hyderabad see video )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफच्या शर्यतीतून हैदराबाद बाहेर, पराभवानंतर मार्करमने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला…
गिलने शतक ठोकताच विराटची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘पुढे जा आणि नव्या पिढीचे…’