---Advertisement---

विराट कोहली, केन विलियम्सनच्या त्या खास फोटोवर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। काल(2 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. काल भारताच्या या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांच्या एका खास फोटोचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

कालच्या सामन्यात हे दोघेही खेळत नव्हते. विराटने काल विश्रांती घेतली होती. तर विलियम्सन खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता. त्यामुळे हे दोघेही काल सामना सुरु असताना मैदानात बाऊंड्री लाईनच्या बाहेर गप्पा मारत बसलेले दिसले. या दरम्यान त्यांच्याबरोबर रिषभ पंतही होता.

त्यांचा या गप्पादरम्यानचा फोटो बीसीसीआयने ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ असे कॅप्शन देत शेअर केला होता. तसेच आयसीसीनेही या दोघांचा फोटो शेअर केला होता. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच या फोटोंवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया देखील आल्या.

काही चाहत्यांनी या फोटोला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘जगातील सर्वात महागडे वॉटर बॉइज’. तर एका चाहत्यांने म्हटले आहे की विराट आणि विलियम्सनचा एकत्र गप्पा मारत बसलेला हा क्षण मालिकेतील सर्वोत्तम क्षण आहे. तर काही चाहत्यांनी या फोटोला गमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

https://twitter.com/omrajguru/status/1223901440923463681

https://twitter.com/virat_always/status/1223906515175657474

https://twitter.com/vishwatweets1/status/1223899102934470656

https://twitter.com/AyushRa56686342/status/1224160059698999299

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---