वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पाडाव करत सलग दुसरा विजय मिळवला. भारतीय कर्णधार रोहित शर्माचे शतक या सामन्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहली व अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांची. या दोघांमधील आयपीएल दरम्यान सुरू झालेल्या वादावर अखेर या सामन्यात पडदा पडला.
https://x.com/CricCrazyJohns/status/1712127620601811448?s=20
नवीन यावर्षी झालेल्या आयपीएलपासून भारतीय चाहत्यांच्या चांगलाच निशाण्यावर होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स या सामन्यात विराट व नवीन यांच्या दरम्यान वाद झालेला. त्यानंतर नवीन याने सोशल मीडियावर अशा काही पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक चांगलेच खवळलेले. याच कारणामुळे भारतीय चाहते त्याला वारंवार ट्रोल करत होते.
The Naveerat bond ???? pic.twitter.com/GW4ADJzvcP
— Kausthub Gudipati (@kaustats) October 11, 2023
नवीन भारतात दाखल झाल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांनी कोहली कोहली असा जप सुरू केला होता. त्यानंतर या सामन्याआधी अफगाणिस्तान संघ सराव करत असताना चाहते कोहली कोहली असा जप करताना दिसत होते. हा सामना सुरू झाल्यानंतर नवीन फलंदाजीला आल्यावरही चाहते मोठ्या प्रमाणात आवाज करत होते. तसेच तो गोलंदाजीला आल्यावर देखील प्रेक्षकांनी विराटच्या नावाने जयघोष केला.
Virat Kohli asking the Delhi crowd to stop mocking Naveen Ul Haq.pic.twitter.com/Dq482rPsFU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2023
या सर्व घटना घडत असताना विराटने स्वतः पुढाकार घेत चाहत्यांना असे न करण्याची सूचना केली. त्यानंतर नवीन याने विराटला धन्यवाद म्हटले. तसेच या दोघांनी गळाभेट घेत हे प्रकरण मिटवले. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचे जोरदार कौतुक होत आहे. (Virat Kohli And Naveen Ul Haq Hug Each Other And Controversy In World Cup)
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने हालवलं ख्रिस गेलचं ‘सिंहासन’, खास यादीत अखेर पहिला क्रमांक मिळवलाच
“माझी बॅटच उत्तर देईल”, विश्वविक्रमी शतकानंतर रोहितचे 12 वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल