---Advertisement---

धोनीला ज्या विक्रमांसाठी अनेक वर्ष लागले ते कोहली- पंत लवकरच मोडणार

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव उंचावले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत बरेच विक्रम नोंदविले आहेत. धोनी हा केवळ भारताचाच नाही तर जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने आपल्या संघाला आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकून दिल्यात. २००७  मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीचे असे काही विक्रम आहेत जे लवकरच कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज रीषभ पंत हे मोडीत काढू शकतात.

२०१४ पासून भारतीय कसोटी संघाचे आणि २०१७ पासून टी२० आणि वनडेच्या भारतीय संघाचे नियमित कर्णधारपद विराट कोहली सांभाळत आहे, तर रीषभ पंतला धोनीचा उत्तराधिकारी मानले जाते. आता हे दोन्ही खेळाडू माजी कर्णधार धोनीच्या काही मोठ्या विक्रमांच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

तर, या लेखात, विराट कोहली आणि रीषभ पंत लवकरच मोडतील अशा ५ विक्रमाबद्दल जाणून घेऊ.

विराट-पंत धोनीच्या या ४ मोठ्या विक्रमांच्या जवळ आहेत.

१. कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने

२००७ च्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाची कमान एमएस धोनीकडे प्रथमच सोपविण्यात आली होती. त्यानंतर, धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. २०१४ पर्यंत कसोटी आणि २०१७ पर्यंत मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद धोनीकडे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार असण्याचा विक्रमही भारताच्या ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या नावावर आहे.

धोनीने तीनही क्रिकेट स्वरूपात मिळून एकूण ३३२ सामन्यात भारताची कर्णधारपदाची धुरा सांभाळली. आता धोनीनंतर २०१४ पासून कसोटी आणि २०१७ पासून मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. कोहलीने आतापर्यंत भारतीय संघाला कोणतेही आयसीसी चषक जिंकून दिला नसला तरी तो अनेक सामने जिंकून स्वतःला सिद्ध करीत संघाला पुढे नेत आहे.

कोहलीने आतापर्यंत एकूण १८१ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यात भारतीय संघाने ११७ सामन्यांमध्ये विजय मिळविला तर संघाने ४७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. आगामी काळात कर्णधार म्हणून धोनीचा हा विक्रम कोहली मोडू शकतो.

२. भारतीय यष्टीरक्षक म्हणून जलद शतक

बऱ्याच विक्रमांमध्ये धोनीचा हा एक विक्रम आहे की त्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. २००४ मध्ये त्याला भारतीय संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर भारतीय संघाचा यष्टिरक्षकाचा शोध धोनीने पूर्ण केला.
चपळ यष्टीरक्षक धोनीने भारताची यष्टीरक्षणाची जबाबदारी घेतल्यानंतर इतर कोणत्याही यष्टिरक्षकांना संघात अधिक संधी मिळाली नाही. कारण त्याची कामगिरी अतुलनीय होती. आज जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात नेत्रदीपक, चपळ यष्टीरक्षकाची चर्चा येते तेव्हा धोनीचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते.

एमएस धोनीने यष्टीरक्षक म्हणून भारतासाठी वनडे सामन्यात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणम येथील वनडे सामन्यात केला. त्याने केवळ ८८ चेंडूत हे शतक ठोकले होते.

धोनीचा हा विक्रम मोडण्यासाठी रीषभ पंत हा सर्वात मोठा उमेदवार मानला जातो. पंत वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि आतापर्यंत वनडेत त्याचा स्ट्राईक रेट १०३.६० आहे. म्हणून, पंत मैदानावर टिकून स्फोटक खेळेल त्या दिवशी माहीचा हा विक्रम मोडण्यीची क्षमता त्याच्याकडे असेल.

३. भारतीय कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात सर्वाधिक विजय

एमएस धोनी हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व केले आहे आणि सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. टी२० प्रकारच्या २७० सामन्यात एमएस धोनीने कर्णधारपद सांभाळले आणि १६० सामने जिंकले. कर्णधार म्हणून धोनीने भारतासाठी टी२० विश्वचषकही जिंकून दिला आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे.

विराट कोहली लवकरच धोनीचा हा विक्रम मागे टाकू शकेल. विराटने आतापर्यंत १३२ टी२० सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे आणि यावेळी त्याने ८५ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत कोहली कर्णधार म्हणून सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

४. कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार

धोनीने अनेक लांबलचक षटकार मारून क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. धोनी क्रिकेट विश्वात उंच आणि लांब षटकार मारण्यासाठीही ओळखला जातो. कर्णधार म्हणून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एकूण २११ षटकार मारले आहेत. धोनीचा हा विक्रम मोडण्याचा प्रबळ दावेदार हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मानले जाते. तसे, विराट हा मैदानी फटके खेळण्यासाठी अधिक ओळखला जातो. पण जेव्हाही कोहली चांगल्या लईत असतो तेव्हा तो मोठे फटकेही मारताना दिसतो.

जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजीचा ठसा उमटविणारा कोहली जेव्हा मैदानावर आला तेव्हा त्याने विक्रम मोडले आहेत. कोहलीने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११७ षटकार ठोकले आहेत. आता अशा परिस्थितीत कोहली लवकरच धोनीच्या कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडू शकेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---