आयपीएलमध्ये जर एखाद्या खेळाडूला अपेक्षेपेक्षा अधिक पैसा मिळाला, तर त्या खेळाडूवर अनावश्यक दबाव बनण्याची शक्यता असते. याच कारणास्तव भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इशान किशनला मोलाचा सल्ला दिला आहे. ईशान किशन आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक किमतीमध्ये विकला गेला आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ व्या मेगा लिलावात इशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये खर्च केले आणि तो हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. ईशानने हे मान्य केले की, मोठ्या रकमेवर विकला गेल्यामुळे त्याच्यावर दबाव बनला होता, पण राष्ट्रीय संघातील सहकाऱ्यांनी त्याला याविषयी विचार न करण्याचा सल्ला दिला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या १२ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला इशान किशन (Ishan Kishan) बोलत होता. तो म्हणाला की, “मोठ्या किमतीत खरेदी केले गेल्यामुळे पहिल्या काही दिवसांमध्ये दबाव असणारच. जेव्हा तो जाणवतो, तेव्हा वरिष्ठ खेळाडूंना याविषयी सांगणे आणि त्यांना आपली समस्या सांगितल्यामुळे फायदा मिळतो.”
“अनेक वरिष्ठ जसे की, रोहित, विराट भाई आणि हार्दिक भाई यांनी सांगितले की, मी मोठ्या रकमेविषयी विचार नाही केला पाहिजे. कारण मी ती रक्कम मागितली नव्हती. जर एखाद्याने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तर तो त्यांनी दाखवला आहे. मोठ्या रकमेविषयी विचार करण्यापेक्षा हे महत्वाचे आहे की, मी माझ्या खेळात सुधारणा करण्याविषयी काय विचार करतो. हे सर्वजन त्या काळातून गेले आहेत.” असे इशान पुढे बोलताना म्हणाला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने देखील इशानला त्याचा स्वाभाविक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. याविषयी बोलताना इशानने सांगितले की, “कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मला माझा खेळ खेळायला सांगितले आहे. संघात प्रत्येकाची भूमिका आहे आणि माझी भूमिका संघाला चांगली सुरुवात देण्याची आहे. जर मी खेळपट्टीवर टिकलो, तर मला ३० किंवा ४० धावांवर बाद होण्यापासून वाचायचे आहे आणि याला मोठ्या खेळीत बदलले पाहिजे.”
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मध्ये चाहत्यांची चांगलीच निराशा केली आहे. मुंबईने चालू हंगामात खेळलेल्या ११ सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘इथे कमजोरांना जागा नाही..’, गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊच्या खेळाडूंवर भडकला मेंटॉर गंभीर
पायातून बूट निसटल्यावरही मुलीने जिंकली २०० मीटरची शर्यत, व्हायरल Video तुम्हालाही करेल प्रेरित