---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून विराट-रोहित एक पाऊल दूर, कोण मारणार बाजी?

On: बुधवार, मार्च 10, 2021 8:55 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेली कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. यानंतर १२-२० मार्च दरम्यान या उभय संघात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. अहमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला मोठा विक्रम करत टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असेल. त्याच्याबरोबरच भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा याचीही त्या विक्रमावर नजर असेल.

विराट बनू शकतो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
विराटकडे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनण्याची संधी आहे. आजवर कोणत्याही क्रिकेटपटूला हा किर्तीमान करता आलेला नाही. विराट सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २०१० ते २०२० या कालावधीत ८५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २९२८ धावा चोपल्या आहेत. जर इंग्लंडविरुद्ध त्याने अवघ्या ७२ धावा केल्या; तर तो ३००० धावांचा टप्पा गाठत इतिहास रचू शकतो.

रोहित असेल विराटला पछाडण्याच्या प्रयत्नात
षटकार-चौकारांचा पाऊस पाडत स्फोटक खेळी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहितचेही आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३००० धावा पूर्ण करण्याच्या मोठ्या विक्रमावर लक्ष असेल. त्याने १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २७७३ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याला ३००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी २२७ धावांची गरज आहे.

तसेच सध्या ९९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८३९ धावा करत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
विराट कोहली (भारत)- २९२८ धावा
मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)- २८३९ धावा
रोहित शर्मा (भारत)- २७७३ धावा
ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)- २३४६ धावा
शोएब मलिक (पाकिस्तान)- २३३५ धावा

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१: जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ संघात होणार चढाओढ, अंतिम फेरीचे असतील प्रमुख दावेदार

सचिन-सेहवाग सपशेल फ्लॉप, इरफानची एकाकी झुंज; तरीही इंडिया लीजेंड्सचा ६ धावांनी पराभव

व्हिडिओ: ‘चेंडूचं माहीत नाही पण डोकं फिरलं,’ आपल्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्याला भज्जीची भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---