---Advertisement---

Ram Mandir । प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधीच विराट अयोध्येत दाखल, सचिन आणि जडेजाबाबत मोठी अपडेट

Virat Kohli is in Ayodhya for Ram Mandir PranPratishtha
---Advertisement---

सोमवारी (21 जानेवारी) अयोध्येत राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी देशभरात आणि देशाबाहेर आनंद आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशातील नामांकीत आणि लोकप्रिय चेहरे अयोध्येत हजेरी लावणार आहेत. भारतीय क्रिकेट संघातील काही दिग्गजांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित केले गेले होते. सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा हे तिघे अयोध्येत उपस्थित झाल्याचे समोर येत आहे.

सोमवारी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी (21 जानेवारी) विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि रविंद्र जडेजा हे तिघेजन अयोध्येत दाखल झाले आहेत. विराट कोहलीचा अयोध्यतील व्हिडिओ देखील समोर आला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार सचिन, विराट आणि जडेजाव्यतिरिक्त या सोहळ्यासाठी इतरही काही क्रिकेटपटूंना आमंत्रित केले गेले आहे. यात दिग्गज एमएस धोनी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार सुनील गावसकर, विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्या नावाच समावेश आहे. सचिन, विराट आणि जडेजासह अनिल कुंबळे देकील रविवारी (21 जानेवारी) अयोध्येत दाखल झाल्याचे समोर आले होते. अयोध्येतील कुंबळेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Virat Kohli and Sachin Tendulkar have reached Ayodhya )

महत्वाच्या बातम्या – 
Sania Mirza । घटस्फोटाबाबत सानियाकडून पहिलीच प्रतिक्रिया! शोएबला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा?
इंग्लंडला तगडा झटका! कसोटी मालिकेपूर्वी धडाडीचा फलंदाज मायदेशी परतला, वाचा काय आहे कौटुंबीक कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---