आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर -१२ फेरीतील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत पाकिस्तान संघाने बाजी मारत भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा भोपळा ही न फोडता माघारी परतला होता. दरम्यान सामना झाल्यानंतर जेव्हा विराट कोहलीला रोहित शर्मा बाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी विराट कोहलीने आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले होते. केएल राहुल ३ धावा करत बाद झाला तर रोहित शर्माला खाते ही उघडता आले नाही.
तर झाले असे की, मोठ्या सामन्यात रोहित शर्मा कडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा होती. परंतु त्याला असे काही करता आले नाही. ज्यामुळे पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने रोहित शर्माबद्दल प्रश्न उपस्थित करत विचारले की,”ईशान किशनला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी दिली जाऊ शकत होती का?”
या प्रश्नाचे उत्तर देत असताना विराट कोहली चकीत झाला होता. त्याने उत्तर देत म्हटले की, “मी तर माझी सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हेन निवडली होती. तुम्हीच सांगा काय बदल करायला हवा. तुम्ही टी२० सामन्यातून रोहित शर्माला बाहेर कराल? सर, जर तुम्हाला वाद हवे असतील तर तसं सांगा, मी त्यानुसार उत्तर देतो.”
https://www.instagram.com/reel/CVbFIiLFphA/?utm_medium=copy_link
पाकिस्तान संघाचा १० गडी राखून विजय
या मोठ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीला साजेशी कामगिरी करता आली नाही. तर कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटकांअखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
त्यानंतर १५२ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान संघाने भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! आयपीएलला मिळाले दोन नवे संघ; ‘या’ कंपन्यांनी जिंकले मालकी हक्क
नो बॉलवर राहुलला दिले गेले बाद?; नव्या वादाला फुटले तोंड
टी२० विश्वचषक: दोन दिवसांत लागले धक्कादायक निकाल; अशी आहे गुणतालिकेची स्थिती